शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये राजकीय नाट्य; ED च्या छापेमारीनंतर मंत्रीमहोदय म्हणतात- मी घाबरणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 16:25 IST

नक्की प्रकरण काय? का मारले छापे, जाणून घ्या सविस्तर...

ED in Rajasthan, Minister Rajendra Yadav: राजस्थानमधील मध्यान्ह भोजन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कारवाईने गेहलोत सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. मंत्री राजेंद्र यादव यांच्या निवासस्थानावर ईडीने छापा टाकला आहे. मंत्र्यांनी याला काँग्रेसविरोधातील जाणीवपूर्वक केलेली कारवाई म्हटले आहे. मध्यान्ह भोजनातील अनियमिततेबाबत गेहलोत सरकारचे मंत्री राजेंद्र यादव यांच्या कोटपुतली येथील निवासस्थानावर ईडीच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईनंतर मंत्री राजेंद्र यादव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. "ईडीच्या माध्यमातून मला त्रास देण्यासाठी कारवाई करण्यात आली आहे, पण मी घाबरणार नाही. मी काँग्रेसमध्येच राहीन. मध्यान्ह भोजनाच्या गोंधळाशी माझा काहीही संबंध नाही", असे स्पष्ट शब्दांत यादव म्हणाले.

गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव यांच्या निवासस्थानी ईडीने ही कारवाई केली. काय कारवाई केली याचा खुलासा अद्याप झालेला नाही. दरम्यान, मंगळवारी सकाळी ७ वाजता ईडीच्या पथकाने मंत्र्यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. यावेळी मंत्री राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत ईडीच्या २४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोन कपाट आणि बॉक्सचे कुलूप तोडले. ज्यामध्ये ईडीला काही कागदपत्रे मिळाली आहेत. या काळात ईडीची कारवाई दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू होती. मात्र, ईडीच्या पथकाला मंत्र्याविरुद्धच्या कारवाईत किंवा माध्यान्ह भोजन योजनेतील अनियमिततेबाबत कोणते महत्त्वाचे क्लूस मिळाले आहेत, हे स्पष्ट झालेले नाही.

ईडीची दुसरी मोठी कारवाई

मंत्री यादव यांचा विभाग हा कौटुंबिक शिक्षण आणि अन्न पुरवठा व्यवसायाशी संबंधित आहेत. याबाबत गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजीही प्राप्तीकर विभागाने गृहराज्यमंत्री यादव यांच्याशी संबंधित ५३ ठिकाणी छापे टाकले होते. यापैकी कोटपुतली येथे राजस्थान फ्लेक्सिबल पॅकेजिंग फॅक्टरी नावाची कंपनी आहे. ज्यामध्ये मंत्री यादव यांनी कंपनीचे पद भूषवले आहे. सध्या राजेंद्र यादव यांचा मोठा मुलगा मधुर यादव हे या कंपनीचे व्यवस्थापक आहेत. याशिवाय यादवचे दिल्ली, गुरुग्राम आणि उत्तराखंडमध्ये पॅकेजिंग प्लांट आहेत. ही आयकर विभागाने यादव यांच्यासंदर्भात केलेली दुसरी मोठी कारवाई आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयRajasthanराजस्थानministerमंत्रीcongressकाँग्रेस