राजस्थानच्या सत्तेची चावी २८ जागांच्या हातात; इथे जो जिंकला, त्याच्या पक्षाचे आले सरकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 10:38 IST2023-11-13T10:37:59+5:302023-11-13T10:38:52+5:30
भाजप-काँग्रेस सरसावले

राजस्थानच्या सत्तेची चावी २८ जागांच्या हातात; इथे जो जिंकला, त्याच्या पक्षाचे आले सरकार
जयपूर : राजस्थानात मेवाड-वागड विभाग निवडणुकीच्या निकालात निर्णायक ठरलेला आहे. या भागात एकूण २८ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी जास्तीत जास्त जागा जिंकणारा पक्ष कायम सत्तेत आलेला आहे. यास केवळ एकच अपवाद हाेता. मेवाडचे महत्त्व दाेन्ही पक्ष ओळखून आहेत. त्यामुळेच आचारसंहिता लागू हाेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र माेदी चित्ताैडगड दाैऱ्यावर आले हाेते. त्यांनी मेवाडला ७ हजार काेटींच्या विकासकामांची भेट दिली हाेती. भाजप आणि काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची मेवाडमध्ये वर्दळ वाढली आहे.
हे भाग महत्त्वाचे (उदयपूर, चित्ताैडगड, बांसवाडा, डुंगरपूर)
२००३
भाजपने २५ पैकी १८ जागांवर विजय मिळविला हाेता. काँग्रेसला ५ जागा मिळाल्या. त्यावेळी भाजपने सरकार स्थापन केले.
२००८
फेररचनेनंतर २८ मतदारसंघ झाले. त्यावेळी १९ जागा काँग्रेसने, तर भाजपने ७ जागा जिंकल्या. काँग्रेसने सरकार स्थापन केले.
२००८
फेररचनेनंतर २८ मतदारसंघ झाले. त्यावेळी १९ जागा काँग्रेसने, तर भाजपने ७ जागा जिंकल्या. काँग्रेसने सरकार स्थापन केले.
२०१८
ही निवडणूक अपवाद ठरली. भाजपने १५, तर काँग्रेसने १० जागा जिंकल्या. कमी जागा जिंकूनही काँग्रेसचे सरकार स्थापन झाले.