शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

"करणी सेना पुढे चालवणार"; गोगामेडींच्या लेकीचा हुँकार, सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 10:36 IST

गोगामेडी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी मोठी गर्दी झाली होती

जयपूर - श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने राजस्थानात खळबळ उडाली आहे. सुखदेव सिंह गोगामेडी हे आपल्या निवासस्थानी असताना तीन हल्लेखोर आले आणि त्यांनी गोगामेडी यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. या हल्ल्यात गोगामेडी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या हत्येचे राजस्थानात पडसाद उमटत असून आज राज्यव्यापी बंदही पुकारण्यात आला आहे. त्यांच्या समर्थकांकडून आंदोलने सुरू आहेत. याप्रकरणी गोगामेडी यांच्या पत्नीने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. आता, वडिलांच्या निधनानंतर मुलीने करणी सेना सांभाळणार असल्याचं म्हटलंय.

गोगामेडी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी मोठी गर्दी झाली होती. गोगामेडी यांच्या कुटुंबीयांचा दु:ख पाहून अनेकांचे डोळे पाणावले. तर, सुखदेव यांच्या कन्येनं या दु:खातही स्वत:ला सावरत वडिलांची सेना पुढे नेणार असल्याचं सांगितलं. गोगामेडीच्या लेकीच्या या शब्दांनी अनेकांना स्फुर्ती दिली, तर भावनिका होऊन काहींचे डोळेही पाणावले. आता, चारही बाजुला पोलीसच पोलीस आहेत, पण हीच पोलिसांची सुरक्षा अगोदर दिली असती तर माझ्या वडिलांचा खून झाला नसता, असेही उर्वशीने म्हटले. 

उर्वशी वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच मीडियासमोर आली. यावेळी, तिने वडिलांच्या निधनावर राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाला लक्ष्य केलं. तसेच, समर्थकांना धीर देत मी अर्ध्या रात्रीची या आंदोलनात सहभागी होण्यासाठी तयार आहे. माझ्या माता-भगिनींना, भावांना माझी गरज असल्यास मी सदैव तुमच्यासाठी हजर राहिल, असेही उर्वशीने म्हटले. माझ्या वडिलांच्या हत्यारांना वाटत असेल वडिलांची हत्या केली म्हणजे आमचं कुटुंब दबून जाईल. पण, सुरमा कभी मरता नही, अमर होता है.... मला सर्वांची साथ मिळाल्यास मीही राजकारणा येईल. वडिलांनी उभारलेली करणी सेना पुढे चालवेन, असेही उर्वशीने अंत्यसंस्कारस्थळी बोलताना म्हटले.  

दरम्यान, करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर हल्ला होऊ शकतो, अशी माहिती पंजाब पोलिसांनी आठ महिन्यांपूर्वीच राजस्थान पोलिसांना दिली होती. मात्र राजस्थान पोलिसांनी हा इशारा गांभीर्याने घेतला नसल्याचं मंगळवारी घडलेल्या घटनेतून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी अद्याप खुलासा केला नसून ते नेमकं काय स्पष्टीकरण देतात, हे पाहावं लागेल.

हल्लेखोरांना अटक

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची त्यांच्याच निवासस्थानी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तीन मारेकरी लग्नपत्रिका देण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरी आले होते. सुरुवातीला हल्लेखोरांनी सोफ्यावर बसून त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि थोड्याच वेळात अचानक त्यांच्यावर गोळीबार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं. प्रत्युत्तरादाखल गोगामेडी यांच्या अंगरक्षकांनी केलेल्या गोळीबारात एक मारेकरी मारला गेला. तसंच दोन आरोपींनी तिथून पळ काढला.

दरम्यान, सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींची ओळख पटली आहे. रोहित राठोड असे एका आरोपीचे नाव असून तो नागौरमधील मकराना येथील रहिवासी आहे. तसंच या प्रकरणातील दुसरा आरोपी नितीन फौजी हा हरियाणातील महेंद्रगडचा रहिवासी आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसjaipur-pcजयपूर