शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला मोठा धक्का, दिग्गज जाट नेत्या ज्योती मिर्धा यांचा भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 15:24 IST

ज्योती मिर्धा या राजस्थानमधील मोठ्या राजकीय कुटुंबातील आहेत.

राजस्थानमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. नागौर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या माजी खासदार ज्योती मिर्धा यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह आणि प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांनी नवी दिल्लीत ज्योती मिर्धा यांच्या पक्षात समावेशाची औपचारिकता पूर्ण केली.

ज्योती मिर्धा या राजस्थानमधील मोठ्या राजकीय कुटुंबातील आहेत. ज्योती मिर्धा या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत नथुराम मिर्धा यांची नात आहेत. नथुराम मिर्धा हे राज्यातील जाट समाजाचे मोठे नेते होते. जाट व्होट बँकेवर त्यांची मजबूत पकड होती. त्यामुळे ज्योती मिर्धा यांचा पक्षात समावेश करून भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाच्या जाट व्होटबँकेला मोठा धक्का दिला आहे.

नागौर लोकसभा मतदारसंघातून भाजप ज्योती मिर्धा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकते. ज्योती मिर्धा २००९ मध्ये खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, २०१४ मध्ये भाजपच्या सी.आर. चौधरी आणि २०१९ मध्ये राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाच्या हनुमान बेनिवाल यांच्याकडून त्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. ज्योती मिर्धा भाजपमध्ये सामील झाल्याने काँग्रेस आणि भाजपची राजकीय समीकरणे बदलली आहेत. तसेच, नागौरची जागा आता बेनिवाल यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अवघड बनली आहे.

सवाई सिंह चौधरी यांनीही भाजपमध्ये केला प्रवेश ज्योती मिर्धा यांच्यासोबत भारतीय पोलीस सेवेतील माजी अधिकारी सवाई सिंह चौधरी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. सवाई सिंह यांनी मागील विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांच्या निवडीसाठी काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीने सोमवारीही प्रक्रिया सुरू ठेवली. समितीचे अध्यक्ष गौरव गोगई यांच्या अध्यक्षतेखाली स्क्रीनिंग समितीने मागील दोन निवडणुकांमध्ये सातत्याने पराभूत झालेल्या २६ विधानसभा जागांसाठीच्या संभाव्य उमेदवारांबाबत ब्लॉक अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांकडून अभिप्राय घेतला. जयपूरमधील काँग्रेसच्या वॉर रूममध्ये ही बैठक झाली.

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपाcongressकाँग्रेस