शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

राजस्थानात प्रचार टीपेला; आदिवासींच्या अधिकारावरुन एकमेकांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 06:33 IST

प्रमुख मुद्दे : लाल डायरी, आदिवासींचे अधिकार अन् जातीय जनगणना

जल, जंगल व जमिनीचे गैरव्यवहार उलगडणार

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : सध्या राजस्थानमध्ये लाल डायरीची जोरात चर्चा सुरू होणार आहे. डायरीतील पाने जसजशी उलगडत जात आहेत, तसतसे जादूगाराच्या चेहऱ्यावरील तेज हरपत चालले आहे. 

काँग्रेसने पाच वर्षांत राज्यातील जल, जंगल आणि जमीन कोणाला कशी विकली, हे डायरीत स्पष्टपणे लिहिले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर केली. राजस्थानच्या अंता येथील प्रचारसभेला मोदी यांनी संबोधित केले. ते म्हणाले, आम्ही विकसित देशाचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवले आहे. राजस्थानचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होऊ शकत नाही. परंतु मागील ५ वर्षांमध्ये काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचारामुळे राजस्थान पीछाडीवर गेले आहे. 

तुमचे स्वप्न, माझा संकल्पnराज्यात भाजपचे सरकार आल्यास भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले. विकसित राज्याचे तुमचे स्वप्न हे मोदींचा संकल्प आहे. nविविध कल्याणकारी योजनांपासून राज्यातील कुणीही वंचित राहणार नाही. तुम्हाला लुटणारा भ्रष्टाचारी वाचणार नाही, असेही मोदी यावेळी म्हणाले. 

देशाच्या विकासात भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण हे तीन प्रमुख अडथळे आहे, परंतु काँग्रेस सरकार त्याशिवाय कामच करू शकत नाही. राज्यात गुन्हेगारी वाढली, महिलांवरील अत्याचार वाढले. पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. 

जल, जंगल व जमिनीचे हक्क मिळवून देणार

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : आदिवासींच्या अधिकार आणि हक्कासाठी केवळ काँग्रेस पक्षच कटिबद्ध आहे. जोपर्यंत काँग्रेस आहे, तोपर्यंत त्यांच्या अधिकारांचे रक्षण करू. आदिवासींच्या मुलांना शिक्षण, मोफत आरोग्य सुविधा दिली जाईल. जल, जंगल आणि जमिनीवरील आदिवासींचे हक्क आणि अधिकार त्यांना मिळवून देणार, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उदयपूर येथील प्रचारसभेत दिले.राहुल गांधी म्हणाले, एखाद्या जातीचे देशात किती प्रमाण आहे, ते कळालेच नाही तर त्यांचे अधिकार, विकासातील वाटा, याबाबत कसे कळणार? जात जनगणना हा देशाचा एक्स-रे आहे. काँग्रेस सरकार पुन्हा सत्तेत आल्यास राज्यात तसेच केंद्रातही काँग्रेस सत्तेवर आल्यास देशभरात जात जनगणना केली जाईल.

भाजपचे इंजिन हाेणार फेल : सचिन पायलटnकाॅंग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी कामा येथील एका प्रचारसभेत भाजपचे इंजिन फेल हाेतील, असा दावा करुन जाेरदार टीका केली. nभाजपकडून नेहमी डबल इंजिन सरकारचा दावा केला जाताे. हा दावा कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशात फसला आहे. आता राजस्थान आणि मध्य प्रदेशातही फेल हाेईल, असे पायलट म्हणाले.

उत्तराखंडमध्ये मजूर बाेगद्यात अनेक दिवसांपासून अडकले आहेत. परंतु, प्रसार माध्यमांमध्ये २४ तास फक्त क्रिकेटबद्दल बाेलले जात आहे. चांगले आहे का? दाेन मिनिटे आमच्या कामगारांना तर द्या, असे सांगून राहुल गांधी यांनी या घटनेकडे लक्ष वेधले.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीprime ministerपंतप्रधान