शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 16:29 IST

Rajasthan News: राजस्थानमधील जयपूर आणि उदयपूरमध्ये एका ट्रान्सपोर्ट कंपनीवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या धाडीमधून मोठं घबाड सापडलं आहे.

राजस्थानमधील जयपूर आणि उदयपूरमध्ये एका ट्रान्सपोर्ट कंपनीवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या धाडीमधून मोठं घबाड सापडलं आहे. टीकमसिंह राव यांच्या या कंपनीवर अवैध वाहतुकीचा आरोप आहे. प्राप्तिकर विभागाच्या शोधमोहिमेमध्ये टीकमसिंह राव यांच्या घरामधून ४ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे १८ कोटी रुपये किमतीचं २० किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे.  त्याशिवाय गोल्डन अँड लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट ऑफिसमधून कोट्यवधी रुपयांच्या देवाणघेवाणीबाबत कागदपत्रंही सापडली आहेत.

प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रान्सपोर्ट व्यापारी टीकमसिंह राव यांच्या कंपनीकडून बेकायदेशीर मालवाहतुकीची तक्रार मिळाली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मिळालेली माहिती खरी असल्याते समोर आले. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी प्राप्तिकर विभागाने राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये धाडी टाकल्या.

गुजरातमध्ये दोन ठिकाणी, मुंबईत एका ठिकाणी, बांसवाडा येथे तीन ठिकाणी, जयपूरमध्ये विश्वकर्मा इंडस्ट्रियल एरियामध्ये एक आणि उदयपूरमध्ये १९ ठिकाणी पथकांकडून शोधमोहिम सुरू आहे. प्राप्तिकर विभाागाचे जयपूर येथील मुख्य संचालक अवधेश कुमार यांच्या सुचननेनुसार ही करावाई २८ नोव्हेंबर रोजी सकाळी सुरू झाली होती. ती अजूनही सुरू आहे. कंपनीच्या उदयपूर, अहमदाबाद, जयपूर आणि मुंबईसह एकूणन २३ ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली.  

मागच्या शुक्रवारी ट्रान्सपोर्ट व्यावयासिक टीकमसिंह यांच्या उदयपूर येथील १९ वेगवेगळ्या ठिकाणांची झडती घेण्यात आली होती. यादरम्यान, २५ किलो सोनं सापडलं. त्याची बाजारामधील किंमत सुमारे १८ कोटी ३४ लाख एवढी असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय येथे कोट्यवधी रुपयांची रोख रक्कमही सापडली आहे. तसेच अनेक लॉकरचीही तपासणी करण्यात येत आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोने आणि रोख रक्कम असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGoldसोनंIncome Taxइन्कम टॅक्सRajasthanराजस्थान