शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य मुले शोधमोहिमेत रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 02:13 IST

शासनाच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या शाळाबाह्य मुले शोधमोहिमेस रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे यश आले.

- जयंत धुळपअलिबाग : ‘ज्ञानदीप मिटवी अज्ञान’ हे ब्रीद स्वीकारून, जन्माला आलेले प्रत्येक मूल शिकलेच पाहिजे, यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या शाळाबाह्य मुले शोधमोहिमेस रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे यश आले आहे.२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात रायगड जिल्ह्यात शोधमोहिमेत ४८५ मुले शाळाबाह्य निष्पन्न झाली. यामध्ये २६२ मुलांचा तर २२३ मुलींचा समावेश आहे. या ४८५ शाळाबाह्य मुलांपैकी १४८ मुले व ११३ मुली अशा एकूण २६१ मुलांना विशेष प्रशिक्षण देऊन शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यात आले. मात्र, उर्वरित ११४ मुले व ११० मुली अशी एकूण २२४ मुले शोधमोहिमेअंती परराज्यात व परजिल्ह्यात स्थलांतरित झाली असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊ न त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाते. यासाठी दरवर्षी घरोघरी जाऊ न मुलांचा शोध घेण्याचे नियोजन केले जाते. स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील बालकांचा शोधदेखील घेण्यात येतो. शाळेत प्रवेश घेतला; पण कायम गैरहजर राहत असलेल्या मुलांचा या मोहिमेत शोध घेण्यात आला. यामध्ये तब्बल ४८५ मुले ही शाळाबाह्य आढळून आली. सर्वाधिक शाळाबाह्य मुले पनवेल तालुक्यात १३५ तर खालापूर तालुक्यात ९७ निष्पन्न झाली तर म्हसळा, श्रीवर्धन व पोलादपूर या तीन तालुक्यांत एकही शाळाबाह्य मूल निष्पन्न झालेनाही.वीटभट्टीवरील हंगामी स्थलांतरितांच्या मुलांमध्ये शाळाबाह्य मुले मोठ्या प्रमाणावर असतात, त्या मुलांचादेखील शोध घेण्यात आला. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात स्थलांतरित होऊन वीटभट्टीवर आलेली एकूण मुलांची संख्या ७२९ असून त्यामध्ये ३८६ मुले व ३४३ मुलींचा समावेश आहे. सर्वाधिक २९३ मुले एकट्या पनवेल तालुक्यात असून या मध्ये मुले १४१ तर मुली १५२ आहेत.वीटभट्टी स्थलांतरित एकूण ७२९ मुलांपैकी ११४ मुले व ११५ मुली अशी एकूण २२९ मुले शिक्षण हमी कार्ड असलेली मुले आहेत. वीटभट्टीवर येऊन स्थलांतरित झालेल्या एकूण मुलांची संख्या ६४३ असून त्यामध्ये ३४३ मुले, तर ३०० मुलींचा समावेश आहे. तर उर्वरित १७० मुले व १३९ मुली अशा एकूण ३०९ मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्यात आले आहे.

टॅग्स :SchoolशाळाRaigadरायगडEducationशिक्षण