शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

यंदाच्या होळीला चढणार राजकीय रंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 5:18 AM

यंदा मतदारांना आकर्षित करण्यासाठी, लोकसभा निवडणुकीत मते आपल्या पारड्यात पाडून घेण्याकरिता आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार विद्यमान खासदार अनंत गीते यांच्या पाठीराख्या पक्ष कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील ३ हजार ९९४ होळ््या आपल्या राजकीय रडारवर घेतल्या आहेत.

- जयंत धुळपअलिबाग  - कोकणात होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, या सणासाठी मुंबईकर चाकरमानी आवर्जून आपापल्या गावी येत असतात. परिणामी यंदा मतदारांना आकर्षित करण्यासाठी, लोकसभा निवडणुकीत मते आपल्या पारड्यात पाडून घेण्याकरिता आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार विद्यमान खासदार अनंत गीते यांच्या पाठीराख्या पक्ष कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील ३ हजार ९९४ होळ््या आपल्या राजकीय रडारवर घेतल्या आहेत. यामुळे यंदाची होळी राजकीय रंगाने रंगून जाणार आहे.कोकणात फाल्गुन पंचमीपासून सुरु होणाऱ्या लहान मुलांच्या होळ््यांपासून सुरु होणाऱ्या या शिमगोत्सवाची सांगता फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी पौर्णिमेच्या दिवशी होते. यंदा या शिमगोत्सवास ११ मार्च रोजी प्रारंभ झाला असून त्यांची सांगता बुधवारी २० मार्च रोजी होळी पौर्णिमेच्या होळीने होणार आहे. यंदा कार्यकर्त्यांच्या राजकीय पक्षप्रवेशांच्या शिमग्यामुळे पारंपरिक शिमगोत्सव मात्र जिल्ह्यात सर्वत्र काहीसा झाकला गेला असला तरी स्थानिक राजकीय पक्ष नेत्यांकडून या बालगोपाळांच्या होळीला यंदा चांगल्या पैकी ‘पोस्त’ (वर्गणी) मिळाल्याची माहिती ग्रामीण भागातील बालगोपाळांकडून प्राप्त होत आहे. यातूनच जिल्ह्यातील सर्व मुख्य सार्वजनिक होळ््या आपल्या ताब्यात घेवून त्यातून मतांची बेगमी करण्याचे नियोजन सर्वच राजकीय पक्षांनी केल्याची माहिती कार्यकर्त्यांकडून प्राप्त झाली आहे.जिल्ह्यातील एकूण ३ हजार ९९४ होळ््यांपैकी २ हजार ८८० होळ््या सार्वजनिक तर १ हजार ११४ होळ््या खासगी आहेत. या व्यतिरिक्त होळीच्या निमित्ताने जिल्ह्यात ६८ पारंपरिक मिरवणुका काढल्या जातात. यावेळी काही ठिकाणी ‘होळीची सोंगे’ देखील काढली जातात. यंदा होळीच्या सणात आपल्याच पक्षाच्या उमेदवाराचे अस्तित्व प्रामुख्याने असावे जेणेकरुन आपला उमेदवार होळीच्या निमित्ताने एकत्र येणाºया प्रत्येक ग्रामस्थांच्या थेट घराघरात पोहोचू शकेल, या हेतूने आघाडी आणि युतीच्या पक्षांनी नियोजन केले आहे. पेण विधानसभा मतदार संघातील पेणमधील १७६, दादर-हमरापूरमध्ये १२४, वडखळमध्ये ७८, नागोठण्यात ५७ आणि पालीमध्ये २१५ अशा एकूण ६५० सार्वजनिक तर ८६ खासगी होळ््या आहेत. या होळ््यांचा मतांच्या दृष्टीने लाभ आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना व्हावा याकरिता आघाडीचा घटक पक्ष असणाºया शेकापचे पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांनी तर काँग्रेसला रामराम करुन मोठ्या अपेक्षेने भाजपाच्या गोटात दाखल झालेले काँग्रेसचे माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या पारड्यात मते पाडून घेण्याकरिता नियोजन केले आहे. त्याच वेळी अनंत गीते यांचे समर्थक किशोर जैन यांनी सेनेच्या माध्यमातून स्वतंत्र प्रयत्न चालविले असल्याचे वृत्त सेनेच्या गोटातून प्राप्त झाले आहे.अलिबागमध्ये ४७१ सार्वजनिक होळ्याअलिबाग विधानसभा मतदारसंघात अलिबागमध्ये १३२, रेवदंडा येथे १६३, मुरुडमध्ये ३४,मांडवा परिसरात २७,पोयनाडमध्ये ११५ अशा एकूण ४७१ सार्वजनिक होळ््या आहेत. खासगी होळ््या २०४ आहेत. अलिबागचे आमदार शेकापचे पंडित पाटील आहेत.आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या पारड्यात अधिक मते पाडण्याकरिता होळीच्या निमित्ताने मतदार संपर्काची संधी सोडू नये अशा स्वरुपाचे नियोजन येथे शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस जनांचे आहे तर अनंत गीते यांच्याकरिता शिवसेनेने होळीचे वेगळे नियोजन केल्याची माहिती सेनेच्या गोटातून प्राप्त झाली आहे.\होळीचे नियोजन नेमके कुणासाठी?श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अवधूत तटकरे आहेत. मात्र त्यांनी लोकसभा उमेदवार आपले काका सुनील तटकरे यांच्या बाबतीत आतापर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. परिणामी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील श्रीवर्धनमधील ७२, रोहा येथील १६७, कोलाडमधील ९५, माणगांवमधील ३१७, गोरेगांवमधील ७८, तळा येथील ७३, दिघीमधील ४२, म्हसळ््यातील ८७ अशा एकूण ९३१ सार्वजनिक आणि २८० खाजगी होळ््यांच्या मतांकरिता पोस्ताचे नियोजन श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी केले तरी ते नेमके कुणासाठी असा एक प्रश्न अनुत्तरित आहे. मात्र येथे आघाडी विशेष: राट्रवादी काँग्रेस आणि युती हे मात्र आपापल्या उमेदवारासाठी नेटाने प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.महाडमध्ये राजकीय पक्ष सज्जमहाडचे आमदार शिवसेनेचे भरत गोगावले आहेत तर काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप येथे तटकरे यांच्याबरोबरचे मतभेद विसरुन आघाडीचा धर्म निभावण्याकरिता (आपली विधानसभा डोळ््यासमोर ठेवून) सक्रिय झाले आहे. महाड तालुक्यातील ३६८ आणि पोलादपूरमधील ७२ अशा ४४० सार्वजनिक आणि १०१ खाजगी होळ््यांच्या माध्यमातून मतदार काबीज करण्याकरिता शिवसेना आणि काँग्रेस पक्ष येथे सज्ज झाला असल्याची माहिती उभय पक्षीयांकडून प्राप्त झाली.आचारसंहितेच्या काळात सण आणि उत्सवांचा वापर राजकीय पक्षांनी प्रचाराकरिता करु नये असे सक्त निर्देश निवडणूक आयोगाचे आहेत. त्यास अनुसरुन आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी १८ भरारी पथके कार्यान्वित आहेत. या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार निष्पन्न झाल्यास कारवाई करण्यात येईल.- डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी

टॅग्स :HoliहोळीPoliticsराजकारण