शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
10
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
11
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
12
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
13
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
14
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
15
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
16
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
17
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
18
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
19
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
20
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार

हेडफोन घालून रूळ ओलांडताना महिला ठार; वाचवायला गेलेल्या तरुणाचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 12:00 IST

अंबरनाथ : कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला, तसेच तिला वाचवायला गेलेल्या तरुणानेही ...

अंबरनाथ : कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला, तसेच तिला वाचवायला गेलेल्या तरुणानेही त्यात जीव गमावला. अंबरनाथच्या मोरीवली गावाजवळ ही घटना रविवारी (दि. २०) रात्री साडेसातच्या सुमारास घडली.वैशाली सुनील धोत्रे (४५) असे या महिलेचे नाव असून, त्या अंबरनाथच्या मोरीवली गावातील रहिवासी होत्या. तसेच मृत तरुण आतिष रमेश आंबेकर (२९) हा महालक्ष्मीनगरात राहत होता. हे दोघेही आनंदनगर एमआयडीसीत एकाच कंपनीत कामाला होते. रविवारी (दि. २०) सायंकाळी ७:३० वाजता ते कंपनीतून घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी आतिष हा वैशाली यांना सोडण्यासाठी बी केबिन रोडवरील मोरीवली गावाजवळ गेला. 

आरडाओरडा केला तरी ऐकू आले नाही !वैशाली या कानात हेडफोन घालून फोनवर बोलत रेल्वे रूळ ओलांडत होत्या. त्यावेळी वेगात रेल्वे येताना पाहून आतिष आंबेकर यांच्यासह अन्य लोकांनी वैशाली यांना हाका मारल्या. पण हेडफोनमुळे त्यांना काहीच ऐकू आले नाही. तेव्हा आतिष आंबेकर यांनी स्वत: त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. वेगाने येणाऱ्या रेल्वेने दोघांनाही धडक दिली.आतिष याच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्न झालेली असून, तो त्याच्या वृद्ध आईवडिलांचा एकमेव आधार होता. वैशाली यांना एक मुलगी आणि २२ वर्षांचा मुलगा असून, त्यांचे पती रिक्षाचालक आहेत. यंदा मुलीचे लग्न करण्याची तयारी करत होते.

टॅग्स :ambernathअंबरनाथAccidentअपघातrailwayरेल्वे