खालापूरात घर कोसळून महिलेचा मृत्यू; वृद्ध महिला गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 18:44 IST2020-10-15T18:43:50+5:302020-10-15T18:44:13+5:30
पावसाने विजांच्या कडकडाटासह चांगलेच झोडपल्याने खालापूरकरांची झोप उडाली होती.

खालापूरात घर कोसळून महिलेचा मृत्यू; वृद्ध महिला गंभीर जखमी
- अंकुश मोरे
वावोशी: खालापुर तालुक्यातील बीङ खुर्द आदिवासीवाडीत बुधवारी राञी घर कोसळून झोपेत असलेल्या शंकुतला गोविंद वाघमारे(वय45)यांचा मृत्यू झाला तर त्यांची आई किसी बाबाजी पवार(वय75) या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे,खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यानी घटनास्थळी भेट दिली.
सदर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याची नुकसान भरपाई त्वरीत मिळावी यासाठी संबंधित खात्याला पत्रव्यवहारातून पाठपुरवा करण्याच्या सूचना आमदार महेंद्र थोरवे यांनी तहसीलदाराना दिल्या.वादळाचा इशारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला होता.
रात्रभर पावसाने विजांच्या कडकडाटासह चांगलेच झोडपल्याने खालापूरकरांची झोप उडाली होती. बीडखुर्द वाडीतील कच्चे कूङामातीचे आणि कौलारू घर मुसळधार पाऊसात तग धरू न शकल्याने ते जमिनदोस्त झाले. त्यामध्ये शंकुतला गोविंद वाघमारे यांचा दुर्देवी अंत झाला. त्यांची आई किसी बाबाजी पवार (वय 75) या जखमी झाल्या आहेत.