शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या राजकारणात आमचे मुद्दे गेले कुठे..? पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत नागरिक अडगळीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:28 IST

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत रस्ते, पाणी, वीज, नाट्यगृह, वाचनालय, स्वच्छ चांगले फुटपाथ, चांगले उद्यान, स्थानिक पातळीवरची चांगली आरोग्य सुविधा या ...

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत रस्ते, पाणी, वीज, नाट्यगृह, वाचनालय, स्वच्छ चांगले फुटपाथ, चांगले उद्यान, स्थानिक पातळीवरची चांगली आरोग्य सुविधा या विषयांची चर्चा व्हावी असे नागरिकांना वाटते. लोकांचे हे प्रश्न कसे सोडवले जाणार? याची उत्तरे नागरिकांना हवी असतात. मात्र धर्म, भाषा, जात यापलीकडे निवडणुका जायला तयार नाही. आरे ला कारे म्हणणे, ठोकाठोकीची भाषा करणे, अत्यंत टोकाला जाऊन राजकारण करणे याच गोष्टी निवडणुकीत जाणीवपूर्वक आणल्या जातात. कारण सामान्य जनतेच्या जगण्या मारण्याच्या प्रश्नावर उमेदवारांना आणि पक्षांना बोलायचेच नसते, असा समज दृढ होत चालला आहे. म्हणूनच हा स्तंभतुमच्यासाठी. नेत्यांच्या राजकारणात सर्वसामान्य नागरिकांचे मुद्दे गेले कुठे? असा सवाल या स्तंभामधून निवडणुका होईपर्यंत विचारला जाईल.

प्रदूषण : वायू, जल प्रदूषणामुळे शहरातील नागरिक बेजारप - नवेल महापालिका क्षेत्रात सध्याच्या घडीला प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात त्रास उद्भवत आहे. तळोजा येथील रासायनिक कारखान्यांचे दूषित पाणी कासाडी नदीमार्गे खारघर, कामोठे, तळोजे खाडीत सोडले जाते. या पाण्यामुळे उग्र दर्प येतो. विशेष म्हणजे मध्यरात्री काही कारखान्यांतून रासायनिक प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होते. ग्रामीण भागातील रहिवासी वर्षानुवर्षे हा त्रास सहन करत आहेत. याशिवाय शहरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे सर्वत्र धूलिकण पसरत असून अनेकांना श्वसनाचा जाणवू लागला आहे. मात्र नव्याने वास्तव्यास आलेल्या शहरी भागातील रहिवासी या समस्यांवर लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. नदी नाल्यांमधील रासायनिक प्रदूषणामुळे मोकाट गुरे, पशु-पक्ष्यांच्या जीवासही धोका उ‌द्भवत असून याप्रकरणी पर्यावरणप्रेमींकडूनही आवाज उठवल्यात येत आहे.

पाणीटंचाई: मुबलक पाणीपुरवठा कधी मिळणार ?श हराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. शिलार, अमृत योजना टप्पा ३ सारख्या प्रकल्पांतून शेकडो एमएलडी पाणी पनवेल पालिका क्षेत्राला मिळणार आहे. मात्र, सद्यस्थितीत पनवेल महापालिका क्षेत्राला २५८ एमएलडी पाण्याची गरज आहे. त्याऐवजी २३० एमएलडी पाणी प्रत्यक्षात मिळत असल्याने अनेक भागांत पाणीटंचाई भेडसावते. तब्बल २८ एमएलडी पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे खारघर, तळोजे, कामोठे, नवीन पनवेल, ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात अपुऱ्या पाणी पुरवठ्यास तोंड द्यावे लागते. याबाबत स्थानिकांकडून सातत्याने मोर्चे, आंदोलने केली जातात. तरीही परिसरातील पाणीसमस्या सुटलेली नाही. त्यातच टैंकर लॉबीने नागरिकांची लूट सुरू केली आहे. २०३६ मध्ये हीच पाण्याची मागणी ५१७ एमएलडीवर जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे वेळेत नियोजित प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

पार्किंग : वाहनतळाचा अभाव, अरुंद रस्त्यांमुळे वाहतूककोंडीअ रुंद रस्त्यांमुळे पनवेलमधील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर कायमच वाहतूक कोंडी होते. तालुक्याचे ठिकाण आणि महत्त्वाची सरकारी कार्यालये, जिल्हा न्यायालय, महापालिका मुख्यालय, मुख्य बाजारपेठ असल्याने याठिकाणी नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्या तुलनेत वाहनतळाचा अभाव शहरात जाणवतो. त्यामुळे अनेकजण रस्त्यालगत वाहने उभी करतात. शहरातील बहुतांश जुन्या इमारतींमध्ये पार्किंगची सुविधा नसल्याने रहिवाशी रस्त्यालगत, अंतर्गत मार्गावर वाहने उभी करतात. वाहनांची संख्या मोठी आणि पार्किंगचा अभावामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. महापालिकेने उभारलेल्या पार्किंग स्थळावर गाड्या उभ्या असल्याचे शहरात चित्र आहे. शहरात काही ठिकाणी सम-विषय पाकिंगची व्यवस्था असली तरी कोंडी सोडवण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.

फेरीवालेः प्रशासनाकडून धोरणाची अंमलबजावणीम -हापालिका क्षेत्रात अद्याप फेरीवाला १ अंमलबजावणी झाली नसल्याने पनवे कळंबोली, कामोठे, तळोजे, खारघर, नः पनवेल सर्वच ठिकाणी फेरीवाल्यांनी रस्ता व्याप त्यामुळे नागरिकांना पदपथाचा वापर करता येत त्यांना रस्त्यावरूनच मार्गक्रमण व्हावे लागते. पां अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. नजीकच्या आठवडा बाजार ही संकल्पना उदयास आली अ शहरात वेगवेगळ्या दिवसांनुसार बाजार भरवले आहेत. सिडकोने विभागनिहाय रोज बाजार उभा तरी बहुतांश फेरीवाले रस्त्यावरच बस्तान मांडून नागरिकांची गैरसोय होते.तुमच्याही भागात असे काही प्रश्न असतील फोटोसह आम्हाला 9594057455 या नंबर पाठवा. तुमच्यासाठी आम्ही ते निवडणुकीचे

English
हिंदी सारांश
Web Title : Panvel Election: Where are citizen's issues? Neglected in politics.

Web Summary : Panvel citizens demand solutions for roads, water, and pollution in elections. Instead, divisive politics dominate, ignoring basic needs. Water scarcity, parking woes, and unregulated vendors plague residents, highlighting administrative challenges and unmet promises. Citizens seek action.
टॅग्स :Panvel Municipal Corporation Electionपनवेल महापालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६