गीतेंना टीकेचा अधिकार काय? - सुनील तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 14:47 IST2024-03-05T14:46:24+5:302024-03-05T14:47:09+5:30
भाजप अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सरचिटणीस बबलू सय्यद यांनी सुनील तटकरे यांना उमेदवारी देऊ नका, दिल्यास मतदान करू नका, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली.

गीतेंना टीकेचा अधिकार काय? - सुनील तटकरे
म्हसळा : अनंत गीते २०१९च्या लोकसभा निवडणुकीत श्रीवर्धन येथे बॅ. अ. र. अंतुले, शरद पवारांवर कडवट टीका करत होते. त्यांना माझ्यावर टीका करण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका खा. सुनील तटकरे यांनी घेतली.
जामिया मोहम्मदिया कोकण (मदरसा) येथील ट्रान्सफाॅर्मरचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सहभागी झाल्यानंतर आमचा सेक्युलॅरिझम संपल्याची आवई ते उठवत आहेत. अंतुले यांनी राज्यात आणि केंद्रात केलेल्या कामाची तुलना मी माझ्याशी केली नाही. यावेळी तटकरे यांनी म्हसळा शासकीय निवासस्थानाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन केले.
‘तटकरेंना मतदान करू नका’
भाजप अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सरचिटणीस बबलू सय्यद यांनी सुनील तटकरे यांना उमेदवारी देऊ नका, दिल्यास मतदान करू नका, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली.
शिंदे गटाचाही दावा
माणगाव : शिवसेना शिंदे गटाचे ॲड. राजीव साबळे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत रायगड लोकसभेवर दावा केला. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.