शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजारामुळे व्यावसायिकांवर परिणाम; भाव स्थिर ठेवण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 23:18 IST

तळ्यात बाजार बंद करण्याची स्थानिक व्यापाऱ्यांची मागणी : भाव स्थिर ठेवण्याची गरज

तळा : तळा शहरात दर बुधवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे स्थानिक व्यावसायिकांवर परिणाम होत असून, तळा शहरातील आठवडी बाजार बंद करण्याची मागणी बाजारपेठेतील स्थानिक व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. 

दर बुधवारी तळा बसस्थानकाशेजारी भरणाऱ्या आठवडी बाजारात बहुतांश व्यापारी हे बाहेरून येऊन आपली दुकाने बाजारपेठेत थाटतात, त्यामुळे सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांमुळे तळा शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

खेड्यापाड्यातील नागरिक फक्त आठवडी बाजारालाच येत असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी उसळते. यामुळे एखादा कोरोनाबाधित रुग्ण संपर्कात आल्यास प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे, तसेच बुधवारी नागरिक आठवडाभराची खरेदी करीत असल्याने बाकी सहा दिवस बाजारपेठेत शुकशुकाट असतो. परिणामी स्थानिक व्यापारावर याचा परिणाम होतो. त्यामुळे दर बुधवारी भरणारा आठवडी बाजार बंद करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे, तर दुसरी बाजू लक्षात घेता नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणारा माल दुकानांपेक्षा आठवडा बाजारात कमी दरात मिळतो, त्यामुळे ग्राहकांना भावात तफावत जाणवत असल्याने नाइलाजाने त्यांना बाजारात माल खरेदी करावा लागत आहे.  स्थानिक व्यापाऱ्यांनी जर आपल्या मालाचे भाव स्थिर ठेवले तर ग्राहक आठवडी बाजाराकडे वळणारच नाहीत असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. 

टॅग्स :Raigadरायगड