आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक; शासनाच्या दडप शाहीला भिक घालत नाही- राजन साळवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 13:14 IST2023-01-20T13:14:10+5:302023-01-20T13:14:24+5:30
माझ्या मालमत्ते बाबत असलेली कागदपत्रे सादर करण्यासाठी मी आज लाच लुचपत कार्यालयात आलो आहे, अशी प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी दिली आहे.

आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक; शासनाच्या दडप शाहीला भिक घालत नाही- राजन साळवी
अलिबाग : सरकार कुणाचे आहे हे सगळ्यांना माहीत आहे. मी ठाकरे गटात आहे. त्यामुळे शासन त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्याच्या दडपशाहीला भीक घालत नाही. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. त्यांनी आम्हाला लढायला शिकवले आहे. माझ्या सारख्या सामान्य शिवसैनिकाला नोटीस पाठवून त्रास देत आहेत. माझे मतदार, जनता यांना राजन साळवी काय आहे हे माहीत आहे. माझ्या मालमत्ते बाबत असलेली कागदपत्रे सादर करण्यासाठी मी आज लाच लुचपत कार्यालयात आलो आहे, अशी प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी दिली आहे.
राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना मालमत्तेच्या चौकशी बाबत रायगड लाच लुचपत विभागाने नोटीस पाठवली होती. त्यानुसार १४ डिसेंबर रोजी आमदार राजन साळवी हे अलिबाग लाच लुचपत कार्यालयात हजर झाले होते. यावेळी आमदार साळवी यांची साडे चार तास चौकशी अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर त्यांना त्याच्या आणि कुटुंबाच्या मालमत्तेची कागदपत्रे सादर करण्यास विभागाने सांगितले होते.
२० जानेवारी रोजी कागदपत्रे सादर करणार असल्याचे साळवी यांनी त्यावेळी सागितले होते. त्यानुसार आमदार राजन साळवी गुरुवारी २० जानेवारी रोजी दुपारी बारा अलिबाग येथील लाच लुचपत कार्यालयात कागदपत्रे घेऊन हजर झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यासह शिवसैनिक त्याच्या सोबत हजर होते.