शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

विक्रमी भातासाठी ‘एसआरटी’चा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 02:39 IST

कमी खर्चात दर्जेदार उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात येतात.

- जयंत धुळप अलिबाग : कमी खर्चात दर्जेदार उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात येतात. सध्या भातपेरणीचा मोसम सुरू आहे. त्यामुळे बळीराजाची लगबग सुरू आहे. पारंपरिक भातशेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा निर्णय रायगड जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांनी यंदा घेतला आहे. त्यामुळे पारंपरिक भातशेतीच्या उत्पादन खर्चात तब्बल ६० टक्के बचत होणार आहे. सरासरी ७ ते १० क्विंटल प्रति एकरी असणारी पारंपरिक तांदूळ (भात) उत्पादकता तब्बल १८ ते २२ क्विंटल प्रति एकरी साध्य करण्याचा यशस्वी प्रयोग कर्जत तालुक्यातील करण्यात आला आहे. जवळपास १३ वर्षे संशोधन करून तयार केलेल्या ‘एसआरटी’चा (सगुणा राईस तंत्र) स्वीकार आतापर्यंत राज्यातील ३ हजार शेतकºयांनी केला आहे. यंदाच्या खरीप हंगामात त्यात आणखी १५०० शेतकºयांची भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही संख्या जवळपास साडेचार हजारांच्या घरात पोहोचणार असल्याची माहिती ‘एसआरटी’ भातशेती तंत्राचे संशोधक शेखर भडसावळे यांनी दिली.१९९८ मध्ये एसआरटी संशोधनाला सुरुवात करण्यात आली. त्याचा पहिला यशस्वी प्रयोग आॅक्टोबर २०११ मध्ये झाला. तांदळाची पारंपरिक एकरी सरासरी उत्पादकता ७ ते १० क्विंटल होती ती एसआरटीच्या प्रयोगाने १८ ते २२ क्विंटलपर्यंत पोहोचेली. त्यानंतर २०१३ मध्ये ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ३० शेतकºयांना प्रायोगिक तत्त्वावर हे तंत्र शेतीसाठी देण्यात आले. त्यांनाही सकारात्मक परिणाम जाणवला. २०१४ मध्ये दापोलीच्या कोकण विद्यापीठाने एसआरटी तंत्राचा प्रयोग स्वीकारून भात लागवड केली, त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने या तंत्राचा झपाट्याने प्रसार झाला. सद्यस्थितीत सगुणाबागेत सामाजिक उपक्रमांतर्गत १५ कृषी पदवीधर शेतकºयांना या तंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे कृषी तज्ज्ञ विविध जिल्ह्यांत जाऊन आधुनिक तंत्रज्ञानातून शेती करण्याबाबत प्रसार करीत आहेत. पुणे जिल्ह्यातील शेतकºयांना भाताची उत्पादकता गतवर्षी ४० ते ५० क्विंटल प्रति एकरी मिळाली आहे.एस.आर.टी. मध्ये शेतीत नांगरट केली नाही तरीही जमीन भुसभुशीत रहाते. एकदा नांगरणी केल्यानंतर साडेचार फुटावर वाफे पाडून, त्यात खरिपात पहिले पीक घेतले जाते. त्यानंतर रब्बीत वाल आणि उन्हाळ्यात मुगाचे नियोजन असते.उन्हाळ्यातील मुगाच्या काढणीनंतर १८ जूनला भातलागवडीच्या कामाला प्रारंभ होतो. जास्त फुटवा येणाºया भातरोपांचे २५ बाय २५ सेंटिमीटरवर टोकण केले जाते, तर बासमतीसारख्या कमी फुटव्याच्या जातींची २० बाय २४ सेंटिमीटरवर लागवड केली जाते.>पिकांची फेरपालटअधिक उत्पादन देणारीभातशेतीत चिखलणी, कोळपणीची किचकट आणि कष्टाची कामे कमी करण्यासाठी २० वर्षांपूर्वी प्रयत्न सुरु केले. याच काळात त्यांनी गादीवाफ्यावर भुईमूग लावला, उरलेल्या काही गादीवाफ्यांवर त्यांनी भाताची लागवड केली. पारंपरिक भातापेक्षा गादीवाफ्यावर भात उत्पादन चांगले आले.या प्रयोगातूनच एस.आर.टी.चा जन्म झाला. एस.आर.टी. म्हणजे भात शेतीसाठी शून्य मशागत तंत्र. यात भात शेतीला मध्यवर्ती धरून त्या भोवतालच्या पिकांची फेरपालट केली जाते. एस.आर.टी.मध्ये भातशेतीत चिखलणी आणि कोळपणी या कष्टाच्या समजल्या जाणाºया कामांना फाटा देण्यात आला आहे. शिवाय भाताचे उत्पन्नही वाढणार आहे.>एस.आर.टी. नेमके काय?भात हे भारतीयांचे प्रमुख अन्न आहे. त्यामुळे तांदळाचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे, त्यासाठी सगुणा बागेत एनजीओच्या माध्यमातून १५ कृषी तज्ज्ञांनी टीम विविध उपक्रम राबवित आहे.सात ते आठ वर्षे नांगरणीची गरज नाही.गादीवाफ्यावर भाताची लागवड.चिखलणी आणि कोळपणीची गरज नाही.भाताची मुळे जमिनीतच कुजण्याची प्रक्रि या.खरिपात धान, रब्बीत वाल आणि मुगाची फेरपालट असे एसआरटी भातशेती तंत्राचे पाच महत्त्वाचे टप्पे आहेत.एसआरटीमध्ये खताची मात्राही कमीसध्या शेतीसाठी मजूर मिळणेही अवघड झाले आहे. मजुरांअभावी काही ठिकाणी भात लागवड होत नाही. अशा परिस्थितीत एस.आर.टी. तंत्र प्रभावी ठरत आहे. भातशेतीत कष्ट कमी करणे, जमिनीचे आरोग्य जपणे, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करणे आणि भाताची उत्पादकता वाढवणे ही एस.आर.टी. तंत्राची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. एस.आर.टी. मध्ये खत देखील कमी लागते. कर्जत तालुक्यातील १०० भात उत्पादक एसआरटीमुळे ५० हजार लिटर डिझेलची बचत करु शकत आहेत.शेतकºयांना मोफत एसआरटी प्रशिक्षणकर्जत येथे सगुणाबागेत एसआरटी तंत्र शिकण्याकरिता येणाºया शेतकºयांना मोफत मार्गदर्शन करण्यात येते. त्यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था देखील मोफत केली जाते. त्यानंतर शेतकºयांच्या गावांत प्रशिक्षण अपेक्षित असल्यास तेथे एसआरटी प्रशिक्षक जावून मोफत प्रशिक्षण देतात. या प्रशिक्षण संधीचा भात उत्पादक शेतकºयांनी लाभ घेवून शेतीतील खर्च कमी करुन उत्पादकता वृद्धिंगत करावी अशी अपेक्षा आहे.- शेखर भडसावळे,एसआरटी संशोधक शेतकरी