शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

माणगावमध्ये विनापरवाना दारू जप्त

By admin | Updated: May 6, 2017 06:16 IST

माणगाव रेल्वे स्टेशन येथे विनापरवाना विदेशी दारू बाळगली असता दोघांना माणगाव बीट मार्शल पोलीस पथकांनी पकडून

 लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : माणगाव रेल्वे स्टेशन येथे विनापरवाना विदेशी दारू बाळगली असता दोघांना माणगाव बीट मार्शल पोलीस पथकांनी पकडून त्यांच्याकडून ६ हजार २२५ रु पयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आली. या घटनेची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस आर. वाय. माने यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास माणगाव बीट मार्शल पोलीस नाईक सी. आर. अंबरगे व त्यांचे जोडीदार पोलीस शिपाई आर. वाय. माने हे माणगाव रेल्वेस्टेशन येथे गस्त घालत असताना त्यांना या व्यक्ती संशयास्पद वावर करताना दिसल्या. त्यांच्या सामानाची झाडाझडती घेतली असता बॅगेतून बीट मार्शल यांना विदेशी दारूच्या बाटल्या सापडल्या. यामध्ये पाच हजार पाचशे रुपये किमतीची मॅकडोल्ड नंबर वन कंपनीचे लेबल असलेल्या काचेच्या १८० मिलीच्या दारूच्या बाटल्या एकूण १०० नग प्रत्येकी किंमत ५५ रु पये, २०० रु . किमतीचे इम्पेरियल ब्लू कंपनीचे लेबल असलेली ७५० मिलीची दारूची बाटली एक नग, ५२५ रु . किमतीचे ओल्ड मंक कंपनीचे लेबल असलेल्या ७५० मिलीच्या तीन बाटल्या, एकूण तीन नग प्रत्येकी किंमत १७५ रु. प्रतिनग असा एकूण सहा हजार दोनशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून विजय धोंडू वाडकर (४३, रा. कल्याण, जि. ठाणे, मूळ दाभोळ, जि. रत्नागिरी) व संतोष धोंडू ठोंबर (४०, रा. वरची ठोंबरेवाडी, जि. रत्नागिरी) या दोघांना अटक केली आहे. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास माणगाव परि. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. एम. एम. भोईर करीत आहेत.