चांढवे येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 01:55 IST2020-12-08T01:54:23+5:302020-12-08T01:55:55+5:30

accident News : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चांढवे गावच्या हद्दीतील कार व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून, एक जण जखमी झाला आहे.

Two-wheeler killed in accident at Chandwe | चांढवे येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

चांढवे येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

बिरवाडी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चांढवे गावच्या हद्दीतील कार व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून, एक जण जखमी झाला आहे. हा अपघात दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे झालेला असल्याने, दुचाकीस्वाराविरुद्ध महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६ डिसेंबर रोजी फिर्यादी सौरभ  चव्हाण (३२, सध्या रा.मुंबई) हे आपल्या ताब्यातील आरटीका कार नंबर एमएच ०१ डी के ६३६४ ही धामापूर जिल्हा रत्नागिरी येथून निघून मुंबईकडे स्वतः कार चालवीत घेऊन जात असताना, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मौजे चांढवे गावच्या हद्दीत ओव्हरब्रिजजवळ आले. त्यावेळी समोरून महाड बाजूकडून पोलादपूर बाजूकडे जाणारी मोटारसायकल एम एच०१ बी पी १४३ ही आरोपी प्रसाद सावंत (२६, भायखळा, मुंबई) याने त्याची मोटारसायकल अतिवेगाने राँग साइडने चालवित घेऊन जाऊन कारच्या समोरील डाव्या बाजूस धडक दिली. अपघातात प्रसादचा मृत्यू झाला व त्याच्या पाठीमागे बसलेला अक्षय कलबाटे (२७ रा  मुंबई) हा गंभीर जखमी झाला आहे.  

गुन्हा दाखल
अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, अपघात हा प्रसाद प्रकाश सावंत  यांचे चुकीमुळे झालेला आहे. या अपघाताची नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

Web Title: Two-wheeler killed in accident at Chandwe