मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात २ ठार; ३ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:22 IST2017-08-31T00:22:23+5:302017-08-31T00:22:33+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास खंडाळा बोगद्याजवळील सिमेंट कमानीलगत खडकाळ भागावर कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात मुंबईचे दोन जण जागीच ठार तर तीन जखमी झाले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात २ ठार; ३ जखमी
खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास खंडाळा बोगद्याजवळील सिमेंट कमानीलगत खडकाळ भागावर कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात मुंबईचे दोन जण जागीच ठार तर तीन जखमी झाले.
केविन कापडिया (२०, रा. ताडदेव, पेडर रोड, मुंबई), पंक्ती पारेख (१८, रा. मुंबई) या दोघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. तर रजत (२०), हर्षल (१९ ) व धैर्य संघवी (१९) हे तिघे जखमी झाले आहेत. केविन याचा वाढदिवस असल्याने हे सर्व जण व इतर दोघांसह केविनच्या लोणावळा येथील ‘माउंट पॅलेस’ या बंगल्यात आले होते. फिरणे झाल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास बंगल्यातून निघून फुडमॉल येथे जेवणासाठी दोन कारमधून हे सर्वजण निघाले. त्यावेळी हा अपघात झाला. अपघातग्रस्त कार केविन चालवत होता. पाठोपाठ दुसरी कार होती.