कंटेनर उलटल्याने मुंबई-पुणे महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 16:21 IST2017-09-04T15:51:49+5:302017-09-04T16:21:11+5:30
मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ एक कंटेनर उलटल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक तासभर पुर्णतः ठप्प झाली होती, असे सांगण्यात येत आहे.

कंटेनर उलटल्याने मुंबई-पुणे महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प
लोणावळा, दि. 04 - मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ एक कंटेनर उलटल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक तासभर पुर्णतः ठप्प झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक कंटेनर खोपोली फुडमॉलजवळ उलटला. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या मध्येच कंटेनर उलटल्याने मुंबईकडे जाणा-या तिन्ही मार्गाच्या लेन बंद झाल्या होत्या. या घटनेमुळे महामार्गावरील मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली होती. या अपघाताची माहिती समजल्यानंतर महामार्ग पोलीस व आयआरबीच्यावतीने सदर कंटेनर बाजूला करण्यात आला. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर करण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला. आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास हा कंटेनर बाजूला करण्यात आला आणि महामार्गावरील वाहतूक सुरु झाली.
दरम्यान, तासवर वाहतूक बंद राहिल्याने महामार्गावर दूरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.