Trial of murder case on Chirner-Ransai road within 4 hours | चिरनेर-रानसई रस्त्यावरील खून प्रकरणाचा १८ तासांत छडा

चिरनेर-रानसई रस्त्यावरील खून प्रकरणाचा १८ तासांत छडा

उरण : तालुक्यातील चिरनेर-रानसई रस्त्यावर महिलेच्या खुनाचा तपास उरण पोलिसांनी अवघ्या १८ तासांच्या अवधीत पूर्ण केला आहे. या खून प्रकरणी एक मुलगी व आई अशा दोन महिलांना मोठ्या शिताफीने अटक केली असून, यातील एक आरोपी फरार झाला आहे.

२४ फेब्रुवारी रोजी उरण तालुक्यातील चिरनेर पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीतील टाकीगाव स्टॉप ते रानसई रस्त्यालगत मकबा फार्महाउसकडे जाणाऱ्या खडीच्या कच्च्या रस्त्यावर कचºयाच्या ढिगाºयावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेचा धारदार शस्त्राने खून केल्याचे निदर्शनात आल्याने उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलिसांनी तपासाची चक्रे जोमाने फिरवून अवघ्या १८ तासांत यातील दोन महिला आरोपींना गजाआड केले आहे.

मृत महिला कल्पना उर्फ जया तुकाराम घाणेकर यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर मुक्तार हुसेन अली संग्राम यांच्यासोबत प्रेमविवाहातून लग्न झाले होते; परंतु त्यांच्या पहिल्या पत्नी (आरोपी) हिला ते मान्य नव्हते. त्यामुळे आरोपी महिला आणि कल्पना या दोघींचे नेहमीच वाद होत होते. त्यामुळे ही सूडबुद्धी मनात ठेवून आरोपी महिला तिची मुलगी आणि मुलीचा मित्र यांनी तिघांनी संगनमत करून कल्पना या राहत असलेल्या मानसरोवर येथील घरातून गव्हाणफाटा-चिरनेर रस्त्याला जोडलेल्या डावीकडे जाणाºया टाकीगाव स्टॉप ते रानसई या रस्त्यावर नेऊन धारदार शस्राने वार करून निर्घृण खून के ला. तिघेही आरोपी कोणताही पुरावा न ठेवता पळून गेले. मात्र, पोलिसांसमोर या तपासाबाबत एक मोठे आव्हान उभे राहिले असतानाही उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी तत्काळ पोलीस पथक तयार करून तपासाला वेग आणला. पोलिसांनी या दुर्घटनेचा पदार्फाश करून दोन महिला आरोपींना जेरबंद केले आहे.

महिला आरोपींना पोलिसी खाक्या दाखविताच केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे. तर त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या आरोपींना उरणच्या कनिष्ठस्तर न्यायालयासमोर हजर केले असता, पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक अतुल आहेर हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Trial of murder case on Chirner-Ransai road within 4 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.