शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

दरड कोसळल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 11:01 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

रायगड - मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गावर पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्यानं दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प झाली आहे. महाडजवळ केंबुर्ली परिसरात दरड कोसळल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. केंबुर्ली ते वहुर-दासगावदरम्यान खाडीलगत दरड कोसळल्याने संपूर्ण महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

दोन जेसीपी व एका क्रेनच्या सहाय्याने दरडीचा ढिगारा हटवण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती रायगड वाहतूक पोलीस शाखेच प्रमुख पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांना दिली आहे.  

काेसळलेल्या दरडीत दगडांपेक्षा लाल मातीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे, चिखलावरुन वाहने घसरण्याची शक्यता असल्याने वाहन चालकांनी काेणत्याही प्रकारे घाई करु नये. वाहतूक पाेलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वराडे यांनी केले आहे. दरम्यान, मुंबईकडून गाेव्याकडे जाण्याकरता छाेट्या वाहनांसाठी 'माणगांव-निजामपुर-पाचाड-महाड' हा पर्यायी मार्गदेखील उपलब्ध आहे.

वाहतूक थांबवली

मुंबई गोवा महामार्गाच्या रूंदीकरणासाठी अनेक ठिकाणी डोंगर खोदण्यात येत आहेत. मात्र केंबुर्ली येथील डोंगर खोदण्यात आलेले काम अर्धवट सोडल्यामुळे ह्या ठिकाणी पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात होती. ज्या ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत त्याठिकाणी एका बाजूला सावित्री नदीचा प्रवाह असल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली होती. बुधवारी (4 जुलै) रात्रभर आणि गुरुवारी (5 जुलै) पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे अखेर या धोकादायक ठिकाणच्या दरडी कोसळल्या. महामार्ग विभागाकडून दरडी बाजूला करण्याचे काम सुरू असून टोळ पुलाजवळ व महाड शहराजवळ वाहतूक थांबवण्यात आली आहे. महाडकडे येणारी वाहतूक टोळ म्हाप्रळ शिरगाव मार्गे वळवण्यात आली आहे. महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस, उपनिरीक्षक पंकज गिरी यांच्यासह महामार्ग वाहतूक पोलीस, महामार्ग विभाग घटनास्थळी कार्यरत आहेत.

नडगावजवळ देखील दरडीचा धोका

महामार्गाच्या रूंदीकरणासाठी महाड पोलादपूरदरम्यान नडगाव येथील डोंगर मोठ्या प्रमाणावर खोदून हे काम अर्धवट सोडून पावसाळ्यापूर्वी थांबवण्यात आले आहे. या ठिकाणच्या दरडीदेखील मुसळधार पावसाने कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भीतीने औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या येणाऱ्या कामगारांना आपला जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. या ठिकाणी देखील एका बाजूला सावित्री नदीचा प्रवाह असल्याने दरडी कोसळल्यास  मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे.

 

टॅग्स :landslidesभूस्खलनMaharashtraमहाराष्ट्रRaigadरायगडgoaगोवाMumbaiमुंबईhighwayमहामार्गRainपाऊसTrafficवाहतूक कोंडी