पेणमध्ये बिल्डींगचा स्लॅब काेसळून तीन जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 19:49 IST2018-12-19T19:49:33+5:302018-12-19T19:49:55+5:30
बुधवारी सायंकाळी पेण शहरातील मिरची गल्लीतील बिल्डींगचा स्लॅब कोसळला. यामध्ये 3 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना पेण शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे.

पेणमध्ये बिल्डींगचा स्लॅब काेसळून तीन जण गंभीर जखमी
अलिबाग - बुधवारी सायंकाळी पेण शहरातील मिरची गल्लीतील बिल्डींगचा स्लॅब कोसळला. यामध्ये 3 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना पेण शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे.
भाजी बाजारात खरेदीला आलेल्या या तीन निरपराध जखमींमध्ये ताराबाई गणपत कोळी नवघर, ता.पेण; सुरेखा सुरेश सावंत आणि विमल नागू ठोंबरे आंबेघर यांचा समावेश आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. निरपराध जखमींना शासकीय आर्थिक सहाय्य तत्काळ मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.