शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

कोकणातील हजारांवर गावे दरडीच्या सावटाखाली ! आणखी ‘इर्शाळवाडी’ होऊ नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 11:42 IST

त्वरेने कार्यवाही होण्याची गरज

अलिबाग : निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्याबरोबरच  सह्याद्रीतील डोंगररांगांचा मोठा वारसा लाभलेल्या कोकणपट्ट्यात त्या पर्वतरांगेच्या पायथ्यांशी लाखो नागरिक निवारा घेत आहेत. या विभागातील २० टक्क्याहून अधिक  म्हणजे तब्बल १,०५० गावे   दरडप्रवण क्षेत्रात आहेत. गेल्या बुधवारी खालापुरातील इर्शाळवावडीत घडलेली दुर्घटना लक्षात घेता, ही गावेही दरडीच्या सावटाखाली असल्याने  ‘दुसरी इर्शाळवाडी’ घडण्यापूर्वी संबंधित गावातील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करणे गरजेचे आहे. अन्यथा आणखी मोठ्या संभाव्य जीवितहानीचा धोका असल्याचे मत व्यक्त होत आहे. 

राज्य सरकारने केवळ घोषणा व आश्वासनापुरते काम न करता संबंधित भागातील ग्रामस्थांच्या समस्यांचा पूर्ण विचार करून सुरक्षित ठिकाणी त्यांच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम  राबविला  पाहिजे, अन्यथा दरवर्षी अशा दुर्घटनांना सामोरे जावे लागू शकेल, अशी भीती संबंधितांतून व्यक्त होत आहे. 

महाराष्ट्रात दरवर्षी  सर्वाधिक म्हणजे सरासरी ३ हजार मि. मी. पाऊस  कोकणात  पडतो.  त्यामुळे साहजिकच या विभागाला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. त्यातही प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात कमी कालावधीत जास्त पाऊस  होतो आणि भरतीची वेळ त्याच कालावधीत असल्यास जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होत असते.  त्यामुळे डोंगराळ भागात राहात असलेल्या नागरिकांना दरडीचा धोका कायम सतावत राहिला  आहे. 

आपत्ती व्यवस्थापनावर भर देण्याची गरज

कोकण विभागात गेल्या ५ वर्षात सरासरी २,२०० ते २,८०० मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   विभागात एकूण ७ जिल्हे असून, ५० तालुके आणि ६ हजार ३५३ गावे आहेत.   नैसर्गिक आपत्तीमध्ये उष्णकटिबंधीय चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, वणवा, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटांना सामोरे जावे लागत आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी पर्यावरणीय समतोल साधण्याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन, निवारण  व जनजागृती प्राधान्याने व  मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. 

कोकण विभागात १,०५० दरडग्रस्त गावे 

कोकण विभागात एकूण ६ हजार ३५३ लहान - मोठी गावे आहेत. शासनानेच केलेल्या सर्वेक्षणात त्यापैकी तब्बल १,०५० दरडग्रस्त गावे आहेत. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील १०३ गावांचा समावेश आहे. यात मुसळधार पाऊस किंवा वादळी वारा झाल्यास याठिकाणी दरडी कोसळण्याची भीती व्यक्त केली आहे. या ठिकाणी अनेक नागरिक राहात आहेत. एकाचवेळी त्यांचे पुनर्वसन शक्य नसले तरी त्याबाबत धोक्याच्या श्रेणीनुसार त्याबाबत कालबद्ध निश्चित कार्यक्रम राबविण्याची गरज आहे.