खारघरमध्ये गोशाळेतील जनावरांची चोरी, दोन गायी, एक बैल चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 02:06 IST2020-12-08T02:06:35+5:302020-12-08T02:06:58+5:30

Crime News : वर्षभरापूर्वी चोरट्यांनी याच गोशाळेतून अशाच प्रकारे गायीची चोरी केली होती.

Theft of cattle from cowsheds in Kharghar | खारघरमध्ये गोशाळेतील जनावरांची चोरी, दोन गायी, एक बैल चोरीला

खारघरमध्ये गोशाळेतील जनावरांची चोरी, दोन गायी, एक बैल चोरीला

 पनवेल : खारघर शहरातील रेल्वे स्थानक लगत असलेल्या नंदिनी गोशाळेत शनिवारी रात्री चोरट्यांनी येथील कर्मचाऱ्यांना धमकावत सुमारे तीन जनावरे चोरून नेली. या जनावरांमध्ये २ गायी व १ बैलाचा समावेश आहे. रात्री १च्या सुमारास चोरट्यांनी हा प्रकार केला. खारघर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्षभरापूर्वी चोरट्यांनी याच गोशाळेतून अशाच प्रकारे गायीची चोरी केली होती. अनधिकृत कत्तलीसाठी अशा प्रकारे गोशाळेतील जनावरांची चोरी केली जात असल्याचा आरोप पूज्य गोळवलकर गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नंदिनी गोशाळेचे संचालक शैलेश खोतकर यांनी केला आहे. खारघरसारख्या शहरात अशा प्रकारे गोशाळेतील गायीची चोरी होणे ही गंभीर बाब आहे. 
यापूर्वीही असे निंदनीय प्रकार घडले असून, या टोळीवर कारवाईची मागणी भारत रक्षा मंचाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा बिना गोगरी यांनी केली आहे. गोशाळेत कार्यरत असलेले कामगार कोमल यादव यांच्या फिर्यादीवरून खारघर पोलीस ठाण्यात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात 
आला आहे.

Web Title: Theft of cattle from cowsheds in Kharghar