नवीन जिल्हाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांशी हितगुज; कार्यालयात पाहणी

By निखिल म्हात्रे | Published: March 1, 2024 04:21 PM2024-03-01T16:21:34+5:302024-03-01T16:22:16+5:30

कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत लवकरच त्यांचा निपटारा करण्यात येणार असल्याचे अश्वासन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.

The new district collector is friendly with the employees | नवीन जिल्हाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांशी हितगुज; कार्यालयात पाहणी

नवीन जिल्हाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांशी हितगुज; कार्यालयात पाहणी

अलिबाग - रायगड जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात प्रत्यक्ष भेट दिली. याबरोबरच कर्मचाऱ्यांशी हितगुज करीत त्यांची आसन व्यवस्था पाहत, दैनदिन कामाबाबत चर्चा करीत येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या. तसेच कार्यालयात स्वच्छतेवर भर द्या असेही अवाहन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखा, निवडणूक शाखा, नोंदणी शाखा, अस्थापना शाखा, गृहशाखा, कुळ व वहीवाट शाखा, खनिकर्म,लेखा, महसूल, पुनर्वसन शाखा, करमणूक कर शाखा, भुसंपादन शाखा, भुमी अभिलेख , नियोजन विभागात भेट देऊन तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्थेची ही तपासणी केली. कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत लवकरच त्यांचा निपटारा करण्यात येणार असल्याचे अश्वासन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कर्यालयाच्या पाहणीत कार्यालयीन स्वच्छता, प्रत्येक टेबलवर असलेली कागदपत्रे सुस्थितीत ठेवणे. अभिलेखात नोंदणी करुन जमा करण्याबाबत सूचनाही दिल्या. आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन त्यांचा लेखा-जोखा तपासण्यात आला. तसेच येणाऱ्या काॅल्स त्यांचे डिटेलींग बाबत हि माहीती घेतली. कार्यालयाच्या परिसरातील बाहय स्वच्छता तत्काळ करुन घ्यावी, असेही यावेळी संबंधितांना निर्देश दिले. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतेवर अधिक भर देण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, नियोजन अधिकारी जे. द. मेहत्रे, जिल्हा प्रशासन अधिकारी नगर विकास शाखा शाम कोशेट्टी, जिल्हा चिटणीस चंद्रसेन पवार, पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे आदी उपस्थित होते.

Web Title: The new district collector is friendly with the employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.