लाडक्या बहिणींना घेऊन येणारी बस मांजरोणे घाटात गेली खाली; २ महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 16:48 IST2024-10-09T16:47:46+5:302024-10-09T16:48:40+5:30
या अपघातात २ महिला जखमी झाल्या असून एका महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. तर दुसरी महिला बसच्या खिडकीतून बाहेर फेकली गेल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.

लाडक्या बहिणींना घेऊन येणारी बस मांजरोणे घाटात गेली खाली; २ महिला जखमी
गिरीश गोरेगावकर -
माणगांव येथे लाडकी बहीण योजना वाचनपूर्ती सोहळा दि. ९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यासह, पुणे, मुंबई, ठाणे येथून बसेस द्वारे लाडक्या बहिणीना आणण्यात आले होते.
माणगांव तालुक्यातील मौजे रानवडे येथील लाडक्या बहिणींना घेऊन येणारी एक बस दु. १२. ४५ वा. च्या सुमारास मांजरोणे घाटात मौजे कुमशेत हद्दीत आली असता रस्ता सोडून ४० फूट खाली गेली. प्राथमिक माहितीत ब्रेक फेल झाल्याने बस खाली गेल्याचे समजत आहे.
या अपघातात २ महिला जखमी झाल्या असून एका महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. तर दुसरी महिला बसच्या खिडकीतून बाहेर फेकली गेल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.