माणगाव ताम्हिणी घाटात भीषण अपघात ! २ महिलांचा मृत्यू, ५५ जण जखमी

By राजेश भोस्तेकर | Updated: December 30, 2023 10:03 IST2023-12-30T10:03:48+5:302023-12-30T10:03:56+5:30

या अपघातात २ महिलांचा मृत्यू झाला आहे तर ५५ जण जखमी आहेत. 

Terrible accident in Mangaon Tamhani Ghat | माणगाव ताम्हिणी घाटात भीषण अपघात ! २ महिलांचा मृत्यू, ५५ जण जखमी

माणगाव ताम्हिणी घाटात भीषण अपघात ! २ महिलांचा मृत्यू, ५५ जण जखमी

राजेश भोस्तेकर 

अलिबाग : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत ताम्हिणी घाटात सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. हा अपघात ट्रॅव्हल्स पलटल्याने झाला.  ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच ०४ एफ के ६२९९  ही पुण्यावरून माणगावकडे येत असताना रस्त्याखाली उतरल्याने पलटी होऊन अपघात झाला आहे. या अपघातात २ महिलांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५५ जण जखमी आहेत. 

जखमींना माणगाव  येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच घटनास्थळी वाहतूक सुरळीत चालू आहे.

मिळालेली माहिती अशी, पुणे येथील खासगी बस कोकणात येत येत होती यावेळी रायगड जिल्ह्यात माणगाव हद्दीत ताम्हिणी घाटात कोंडेथर वळणाजवळ या बसला अपघात झाला. या अपघातात ५५ जण जखमी झाले आहेत तर २ महिलांचा मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: Terrible accident in Mangaon Tamhani Ghat

टॅग्स :Accidentअपघात