शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१९ पासून सोशल मीडियावर डॉक्टरांचं ब्रेनवॉश; व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युल तपासात मोठा खुलासा
2
Baramati Nagar Parishad: "आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ
3
उत्तर प्रदेशमध्ये संशयित ४०० बँक खाती तपासली; जम्मू आणि काश्मीरमधील डॉक्टरांचे  लागेबांधे
4
लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मंधानाने अचानक इंस्टाग्रामवरून काढून टाकल्या 'या' खास पोस्ट
5
Paytm च्या फाऊंडरचं बिल झालं व्हायरल; ₹४०,००० च्या जेवणावर वाचवले ₹१६,०००, कशी झाली ही कमाल
6
पेशावर हादरलं! निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर मोठा आत्मघाती हल्ला; गोळीबारात तीन दहशतवादी ठार
7
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पंकजा मुंडेचे PA अनंत गर्जे यांना अटक, आज कोर्टात हजर करणार !
8
"गोंधळ घालायचा असेल तर येऊ नका...", कार्यक्रमात झालेल्या राड्यानंतर गौतमी पाटीलचं आवाहन
9
IND vs SA : गुवाहाटी कसोटी जिंकण्यासाठी शास्त्रींचा टीम इंडियाला 'अजब-गजब' सल्ला; म्हणाले...
10
अनपेड इंटर्नशिप ते कमी पगाराच्या पहिल्या नोकरीपर्यंत, नवीन लेबर कोडमुळे तरुणांचे बदलणार आयुष्य
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex १९५ अंकानी वधारला; Nifty २६,१०० च्या पार, 'या' शेअर्समध्ये तेजी
12
Sangli Accident: नशेत राँग साईडने निघाला, ६ गाड्या उडवल्या, अनेक जखमी; संतप्त लोकांनी स्कोडा कार फोडली
13
"मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा
14
म्युच्युअल फंडावर टॅक्स कसा लागतो? इक्विटी आणि डेट फंडसाठीचे नियम काय, टॅक्स वाचवण्याचे मार्ग जाणून घ्या
15
भारताच्या 'दुर्गा' सीमेचं रक्षण करणार, चीन सीमेवर महिला कमांडो; १० चौक्या उभ्या राहणार
16
"उदयपूरमध्येच आमची लव्हस्टोरी...", रणवीर सिंहने दीपिकासोबतच्या आठवणींना दिला उजाळा
17
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
18
आजचे राशीभविष्य, २४ नोव्हेंबर २०२५: मन आनंदी राहील, आर्थिक लाभ होतील, नोकरीत लाभ होतील !
19
'बिग बॉस मराठी ६' लवकरच? कलर्स मराठीने शेअर केला 'धमाकेदार' प्रोमो, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरकार्यावेळी तळीयेमध्ये फुटला नातलगांच्या अश्रूंचा बांध, जागविल्या आप्तांच्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 08:47 IST

महाड तालुक्यातील तळीये दरड दुर्घटनेला मंगळवारी १३ दिवस पूर्ण झाले. मृत झालेल्यांचे उत्तरकार्य मंगळवारी गावात करण्यात आले. मृतांच्या नातेवाइकांच्या डोळ्यांतून आजही अश्रूंचा बांध फुटला होता.

रायगड : महाड तालुक्यातील तळीये दरड दुर्घटनेला मंगळवारी १३ दिवस पूर्ण झाले. मृत झालेल्यांचे उत्तरकार्य मंगळवारी गावात करण्यात आले. मृतांच्या नातेवाइकांच्या डोळ्यांतून आजही अश्रूंचा बांध फुटला होता. अशा शोकाकुल वातावरणात तळीये गावात मृतांचे उत्तरकार्य पार पडले.२२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत तळीये गावात पूर्ण डोंगर वाडीवर कोसळला आणि क्षणार्धात वाडीला गिळून टाकले होते. सरकार आणि प्रशासनाने बचावकार्य हाती घेतले. मात्र, एकही जिवंत व्यक्ती सापडली नाही. ५४ मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले. उर्वरित ३१ नागरिकांना मृत घोषित करण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी पाठविण्यात आला आहे. काही मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. तळीये दुर्घटनेला मंगळवारी १३ दिवस पूर्ण झाले. मृतांच्या आत्माला शांती लाभावी यासाठी रीतीरिवाजाप्रमाणे ८४ मृतांचे तेराव्याचे उत्तरकार्य गावात करण्यात आले. यावेळी मृतांच्या नातेवाइकांना दुःख अनावर होत होते. तसबिरीचे दर्शन घेताना आपला माणूस गेल्याच्या दु:खात त्यांनी हंबरडा फोडला. तळीये गावावर शोककळा पसरली होती.उत्तर कार्यासाठी प्रशासनाने सहकार्य केले. ग्रामस्थांनीही मोलाचे सहकार्य केले, अशी माहिती स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. घडलेली दुर्घटना अत्यंत वाईट असून, मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी श्रद्धांजली त्यांनी वाहिली. या प्रसंगी जिल्हाधिकारी निधी चौधरी, ठाण्याचे उपमहापौर नरेश म्हस्के, अशोक पांडे, पंचायत समिती सभापती स्वप्ना मालुसरे, जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड  उपस्थित होते. 

ग्रामस्थ झाले भावनावश तळीये दुर्घटनेला मंगळवारी १३ दिवस पूर्ण झाले. मृतांच्या आत्माला शांती लाभावी यासाठी रीतीरिवाजाप्रमाणे ८४ मृतांचे तेराव्याचे उत्तरकार्य गावात करण्यात आले. यावेळी मृतांच्या नातेवाइकांना दुःख अनावर होत होते. तसबिरीचे दर्शन घेताना आपला माणूस गेल्याच्या दु:खात त्यांनी हंबरडा फोडला. तळीये गावावर शोककळा पसरली होती.

टॅग्स :Raigadरायगडlandslidesभूस्खलन