शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
4
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
5
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
6
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
7
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
8
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
9
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
10
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

जेएनपीटी वसाहतीत शिक्षकांची निदर्शने, आर.के. फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांना घेराव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 12:53 AM

Raigad News : जेएनपीटी वसाहतीमध्ये मराठी, इंग्रजी माध्यमाची दहावीपर्यंत शाळा आहे. जेएनपीटीच्या मालकीच्या या शाळेत २७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जेएनपीटीने याआधी ३० जून २०१९ पर्यंत शाळा सलग २० वर्षं इंडियन एज्युकेशन सोसायटी मुंबई यांना करारावर चालविण्यास दिली होती.

उरण : जेएनपीटी वसाहतीमधील आर.के. फाउंडेशनच्या शाळेतील सहा शिक्षकांवर वेतनाच्या नावाखाली देण्यात येणारी अनामत रक्कम स्वीकारण्यास नकार दिल्याचा ठपका ठेऊन तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. संस्थेच्या मनमानी कारभारामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी जेएनपीटी शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली घेराव घालून निदर्शने केली.जेएनपीटी वसाहतीमध्ये मराठी, इंग्रजी माध्यमाची दहावीपर्यंत शाळा आहे. जेएनपीटीच्या मालकीच्या या शाळेत २७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जेएनपीटीने याआधी ३० जून २०१९ पर्यंत शाळा सलग २० वर्षं इंडियन एज्युकेशन सोसायटी मुंबई यांना करारावर चालविण्यास दिली होती. त्यानंतर करार संपुष्टात आल्यानंतर काढण्यात आलेल्या निविदानंतर ही शाळा १ जुलै २०१९ पासून मालाड-मुंबई येथील रुस्तमजी केरावाला फाऊंडेशनला चालविण्यासाठी देण्यात आली आहे. तेव्हापासून या संस्थेमार्फत शाळा चालवली जात आहे. या शाळेत ११४ शिक्षक मागील ३० वर्षांपासून काम करीत आहेत. संस्थेने नियमांची पायमल्ली करून शाळेचा ताबा घेऊन कामकाज सुरू केले आहे. मात्र संस्था नियमानुसार काम करीत नसल्याच्या ३० वर्षांपासून काम करीत असलेल्या शिक्षकांच्या तक्रारी आहेत.दोन वर्षांपासून शिक्षकांना देण्यात येणाऱ्या वेतनात कपात केली आहे. वेतनही देताना अनामत रक्कम म्हणूनच दिले जात आहे. दोन वर्षांपासून शिक्षकांच्या खात्यात ग्रॅज्युईटी, पीएफची रक्कम जमा करण्यात आलेली नाही. सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या रकमा अदा करण्यात टाळाटाळ केली जात आहे. अशा विविध प्रकारच्या तक्रारी शिक्षकांकडून केल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी वेतनाच्या नावाखाली अनामत म्हणूनच दिली जाणारी रक्कम स्वीकारण्यास नकार देणाऱ्या सहा शिक्षकांवर संस्थेने तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे.  ‘सहा शिक्षकांवरील निलंबनाची कारवाई मागे घ्या’ संस्थेने चालविलेल्या मनमानी आणि नियमबाह्य कारभारामुळे शिक्षकवर्ग संतप्त झाला आहे. सहा शिक्षकांवर निलंबनाची केलेली कारवाई मागे घेण्याची मागणी शिक्षकांची आहे. यासाठीच शिक्षकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याची माहिती शाळेच्या शिक्षिका सुषमा कोल्हे यांनी दिली. निलंबित शिक्षकांच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल करण्याची तसेच याबाबत न्यायालयात दाद मागण्याची घोषणाही जेएनपीटी शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली. 

टॅग्स :RaigadरायगडTeacherशिक्षक