शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

रायगडमध्ये प्रचाराच्या तलवारी म्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 1:15 AM

विजयासाठी छुप्या प्रचाराची शस्त्रे; निवडणूक विभागाची करडी नजर, २३ एप्रिलला मतदान

- आविष्कार देसाई अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदानाच्या ४८ तास आधी म्हणजेच रविवारी सायंकाळी ५ वाजता निवडणूक लढवत असलेल्या राजकीय पक्षांनी आपापल्या प्रचाराच्या तलवारी म्यान केल्या. स्टार प्रचारकांच्या प्रचार सभेमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. या सभांमधून जनतेचे प्रश्न, विकासाचे मुद्दे हरवल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्यामध्येच सरळ लढत होणार आहे. याच कारणासाठी आघाडी आणि युतीसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची असल्याने छुप्या प्रचाराला आता वेग येणार असल्याचे बोलले जाते. आता निवडणूक विभागाचे यावर असणारे बारीक लक्ष भेदून मतदारांपर्यंत कसे पोहोचणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीकडून अनंत गीते हे निवडणूक लढवत आहेत. दोघांसाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याने खूपच प्रतिष्ठेची झाली आहे. तटकरे यांना गीते यांनी २०१४ साली अवघ्या दोन हजार ११० मतांनी पराभूत केले होते, त्यामुळे तटकरे या निवडणुकीत त्याची परतफेड करतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गीते यांच्या बाजूने प्रामुख्याने भाजप आणि अन्य मित्रपक्ष आहेत, तर तटकरे यांना काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीआरपी (कवाडे गट) यांच्यासह अन्य मित्रपक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे तुल्यबळ उमेदवारांमध्ये सुरुवातीपासूनच सामना रंगला होता. त्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान करत दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रचाराचा पारा चांगलाच चढला होता. दोन्ही बाजूने एकमेकांवर शाब्दिक तोफांचे मारे करून उमेदवारांच्या मनोधैर्याच्या चिंधड्या उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात भरीस भर म्हणून प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दोन्हीकडून स्टार प्रचाराकांची टीम रणांगणात उतरवली होती. त्यांनीही प्रचारतंत्राचा वापर करत आक्रमण अधिक तीव्र करून धोबीपछाड देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, डॉ. अमोल कोल्हे, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुभाष देसाई, रामदास कदम, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य स्टार प्रचारकांचा समावेश होता.गीते यांच्या प्रचारासाठी आलेल्या सर्वच स्टारप्रचारकांनी तटकरे यांच्यावर मागील निवडणुकीत केलेले भ्रष्टाचाराचे आरोप याही निवडण्ुाकीत शस्त्र म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी चौकशीला सामोरे जात आहे. गेल्या पाच वर्षांत युतीचे सरकार माझ्यावर आरोप सिद्ध करू शकले नाही. शपथपत्रामध्ये एकही गुन्हा दाखल नाही, असा प्रतिहल्ला करत तटकरे यांनी आरोप परतावून लावले. गीते हे गेले ३० वर्षे खासदार आहेत. त्यामध्ये तीन वेळा केंद्रामध्ये मंत्री होते. या कालावधीत त्यांनी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी कोणते ठोस काम केले हे दाखवावे, असे आव्हान तटकरे यांनी दिले होते. मात्र, गीतेंना याचे उत्तर देता आले नव्हते.उमेदवारांची नवी रणनीतीरविवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत, आता छुप्या प्रचारासाठी त्या-त्या उमेदवारांनी रणनीती आखली आहे. त्यानुसार मतदानाच्या आधी म्हणजेच दीड दिवस छुप्या प्रचारावर जोर देण्यात येणार आहे. त्यामध्ये आपापल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमार्फत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. निवडणूक विभागाचीही नजर अशा छुप्या प्रचारावर राहणार असली तरी, अतिशय जागरूकपणे दिलेली जबाबदारी त्यांच्याकडून निभावण्यात येईल, याबाबत कोणाच्याच मनात शंका असण्याचे कारण नाही.आरोप-प्रत्यारोपगीते यांनी २००४ आणि २००९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बॅ. ए. आर. अंतुले यांच्यावर अतिशय खालच्या पातळीचे आरोप केले. त्याचप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही बॅ. अंतुले यांना हिरवा साप अशी उपमा दिली होती. त्याच शिवसेनेला आणि गीते यांना या निवडणुकीत मुस्लीम मतांसाठी बॅ. अंतुले यांचा पुळका आल्याने त्यांनी त्यांचे पुत्र नावीद यांना शिवसेनेत घेतले. नावीद यांनीही तटकरे यांच्यावर टोकाची टीका केली. मात्र, तटकरे अथवा त्यांच्या आघाडीतील प्रचारकांनी गीते यांना वैयक्तिक लक्ष्य न करता त्यांना विकासावरच टार्गेट केले.प्रचारसभा गाजल्याआघाडीचे सुनील तटकरे आणि युतीचे अनंत गीते या दोन दिग्गज उमेदवारांच्या प्रचाराव्यतिरिक्त अन्य एक मुलूख मैदानतोफ रायगडातही धडाडली होती. ती म्हणजे मनसेप्रमुख राज ठाकरे यांची. त्यांनी भाजपला आणि युती असणाºया उमेदवारांना मतदान करू नका असा प्रचार केला. त्यांनी सभांमधून भाजप सरकार कसे खोटारडे आहे, हे त्यांनी ‘ लाव रे तो व्हिडीओ’च्या माध्यमातून पुराव्यासह भाजपचे मोदी आणि शहा यांचा आणि त्यांच्या योजनांचा भांडाफोड केला. अशा सर्वच प्रचारकांच्या प्रचारसभा चांगल्याच गाजल्याने चर्चेचा विषय झाल्या. मात्र, विकासाचा मुद्दा यामध्ये कोठे तरी हरवल्याचे दिसले.अनंत गीते- सुनील तटकरे यांच्यातच ‘टशन’आगरदांडा : लोकसभा निवडणुकीचा प्रचार रविवारी अंतिम टप्प्यात आला. या सर्व परिस्थितीत कोणाचे पारडे जड याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. तूर्तास रायगड जिल्ह्यात तटकरे तर रत्नागिरीत शिवसेनेची ताकद जमेची मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांत ‘टशन’ होणार आहे. रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक २३ एप्रिल रोजी होत आहे.रविवारी सायंकाळी ५ वाजता प्रचाराची सांगता झाली. तत्पूर्वी कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर रत्नागिरीत शिवसेनेला मोठी संधी मिळणार आहे असे चित्र दृष्टीस पडत आहे. खरी लढाई शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे सुनील तटकरे यांच्यात होणार आहे. सर्व परिस्थितीत दोन्ही पक्षांकडून आपला विजय होईल असा दावा करण्यात आला आहे. परंतु नेमके काय चित्र होईल? कोणाच्या पाठी राहावे याचा निर्णय मतदारराजाच्या हातात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडAnant Geeteअनंत गीतेsunil tatkareसुनील तटकरे