शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

रायगड जिल्ह्यात दीड लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 11:38 PM

पालकमंत्री आदिती तटकरे यांची माहिती : मुख्यमंत्र्यांनी घेतला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा समन्वयाने काम करीत आहेत. आतापर्यंत या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ६४ हजार ३२९ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच या मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या.या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचार करताना, काही अडचण असल्यास कोरोना टास्क फोर्सशी सल्लामसलत करावी. ग्रामपंचायत पातळीवर अधिक लोक सहभागी होतील, याकडे लक्ष द्यावे. प्रचार प्रसिद्धीसाठी विशेष प्रयत्न करावेत, कोरोना दक्षता समित्या कार्यरत राहतील, याकडे लक्ष द्यावे, माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत एकाच समान बोधचिन्हाचा वापर सर्वत्र करावा, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार धुणे, सॅनिटायझरचा नियमित वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या बाबींचे नियमित पालन करावे आणि नागरिकांच्या सहभागाने महाराष्ट्र सदृढ बनविण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील राहावे, अशा सूचना दिल्या.‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्ह्यात एकूण १ हजार ५०० पथके नेमली आहेत. रायगड जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किमान २ बेड राखीव ठेवून कोविड कॉर्नर निर्माण करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील आॅक्सिजन बेड वाढविण्यासाठी, तसेचजवळपास १२० व्हेटिंलेटर्स उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.कोविड १९ मधून बरे झालेल्या रुग्णांच्या इतरांना प्रोत्साहन व बळ मिळेल, अशा मुलाखती प्रसारमाध्यमांद्वारे सर्वत्रप्रसिद्ध केल्या जाणार आहेत असेस्पष्ट केले.याप्रसंगी, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे उपस्थित होते.साडेसात लाख घरांच्या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यात एकूण ७ लाख ७५ हजार २२५ घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे. आजपर्यत १ लाख ६४ हजार ३२९ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षण पथकाला आरोग्य सुरक्षाविषयक सर्व प्रकारची आवश्यक साधनसामुग्री पुरविण्यात आली आहेत, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.आरोग्य केंद्रांना सक्षम करणे गरजेचेप्राथमिक आरोग्य केंद्रांना अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास मृत्युदराचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असे सांगून हे सर्वेक्षण सर्वांसाठी आहे. या भावनेने लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागान ही मोहीम जिल्ह्यात सर्वस्तरावर यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस