शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"सुनील तटकरे हे रोजच पक्ष बदलतात, मी मात्र लोकसभा लढविणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 07:05 IST

जयंत पाटील : शेकाप हा इंडिया आघाडीचा घटक पक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : खासदार सुनील तटकरे हे रोज पक्ष बदलत असतात, अशी टीका शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केली. यावेळी ते म्हणाले, आमचा पक्ष हा इंडिया आघाडीत सहभागी असून, आगामी ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणूक या आघाडीतून लढवणार आहे. शेकाप हा लोकसभेला इच्छुक नाही. जो उमेदवार इंडिया आघाडी देईल त्याचे काम आम्ही करणार आहोत, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

यावेळी त्यांनी आमदार अपात्रतेबाबतही भाष्य केले. सुनावणीबाबत जाणूनबुजून उशीर केला जात आहे. सर्वोच्च न्यायालय गांभीर्याने हे प्रकरण घेईल. आठ दिवसांत याबाबत चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. आरडीसीसी बँकेवर सहाव्यांदा चेअरमनपदी विराजमान झाल्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत शेकापची भूमिका काय, आमदार अपात्रता सुनावणी आणि राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केले. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या विजयात शेकापचा खारीचा वाटा आहे. मात्र, सध्या तटकरे हे अजित पवार गटात आहेत. याबाबत पाटील यांना प्रश्न विचारला असता, सुनील तटकरे हे रोज पक्ष बदलत आहेत, असे सांगत ते नेमके कोणत्या राष्ट्रवादीत आहेत, हेही कळत नाही. मात्र, पक्ष बदलीबाबत जनतेची तीव्र नाराजी आहे, असे पाटील यांनी सांगितले.

  शेकाप हा इंडिया आघाडीमध्ये आहे. प्रागतिक पक्षाचा प्रमुख म्हणून मी इंडिया आघाडी बैठकीत होतो.   संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी आम्हाला त्याग करावा लागला तरी चालेल.   इंडियाच्या माध्यमातून सर्व निवडणुका आम्ही एकत्रित लढवणार आहोत.   शेकाप हा लोकसभेसाठी इच्छुक नाही. जो उमेदवार आघाडी देईल त्याचे काम करणार आहोत, असे स्पष्टीकरण आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस