शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील जंगल वणवे रोखण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 03:10 IST

कोकणात सर्वत्र वर्षानुवर्षे डोंगर भागात वणवे लागून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वनसंपत्ती व वन्यजीवांची मोठी हानी होत असते. वनविभाग वा अन्य कोणतीही शासन यंत्रणा वणवे थांबविण्याकरिता कोणतीही उपाययोजना करण्यासाठी पुढे येताना दिसत नाही.

जयंत धुळप अलिबाग : कोकणात सर्वत्र वर्षानुवर्षे डोंगर भागात वणवे लागून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वनसंपत्ती व वन्यजीवांची मोठी हानी होत असते. वनविभाग वा अन्य कोणतीही शासन यंत्रणा वणवे थांबविण्याकरिता कोणतीही उपाययोजना करण्यासाठी पुढे येताना दिसत नाही. मात्र, भिवघरच्या तरुणांनी याकामी गेल्या २००७ मध्ये पुढाकार घेवून जंगल वणव्यांपासून आपल्या गावाचे आणि नैसर्गिक संपत्तीसह वन्यजीवांचे रक्षण करण्याचे धाडसी काम सुरू केले आणि आज त्यातून मोठे यश प्राप्त झाले आहे.महाड तालुक्यात अत्यंत दुर्गम डोंगर भागात वसलेले भिवघर हे जेमतेम तीन हजार लोकसंख्येचे गाव. सारेच शेतकरी. डोंगराच्या कुशीत विसावलेल्या या गावाच्या शेजारील डोंगरावर २०१२ मध्ये एक मोठा जंगल वणवा लागला आणि पाहतापाहता तो खाली गावात येवून पोहोचला. त्यात जंगलाशेजारी राहणाऱ्या आदिवासींच्या १० ते १२ झोपड्या त्यातील संसारासह जळून भस्मसात झाल्या. त्या आदिवासी कुटुंबांचे संसार उघड्यावर आले. याच दुर्दैवी घटनेअंती ग्रामस्थ आणि काही तरुणांनी यापुढे वणवा लागूच द्यायचा नाही आणि लागलाच तर पुन्हा आपल्या गावापर्यंत पोहचू द्यायचा नाही असा पक्का निर्धार केला आणि त्या कामाला सुरुवात केल्याचे वणवा आणि वृक्षतोड प्रतिबंध उपक्रम अमलात आणलेल्या भिवघर वनप्रेमी संघटनेचे प्रमुख किशोर पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जंगलातील जाळ रेषा व पाण्याच्या टाक्यांतूनवणवे नियंत्रण मिळवण्यात यशवणवा आणि वृक्षतोड प्रतिबंध उपक्रमाचे स्वरूप सांगताना पवार म्हणाले, उन्हाळ्याच्या दिवसात गावापासून जवळच असलेल्या डोंगरावर ४ ते ५ किलोमीटरची पायपीट करून तरुण मंडळी जातात. जाताना डोक्यावर पाण्याचे ड्रम घेवून जातात. तेथे संभाव्य वणव्याच्या जाळरेषा आखल्या जातात. जाळरेषा म्हणजे, वणवा लागलाच तर इतरत्र पसरू नये यासाठी डोंगरमाथ्यावरील वाढलेले गवत एका ठरावीक अंतरावर कापले जाते. तेथे पडलेला सुका पालापाचोळा उचलला जातो. त्यामुळे वणवा पेटलाच तर पुढे पसरत नाही. शिवाय तेथे छोट्या पाण्याच्या साठवण टाक्या बांधल्या आहेत त्यात सोबत नेलेल्या ड्रममधील पाणी साठवून ठेवले जाते. चुकून कधी वणवा लागलाच तर तो विझवण्यासाठी त्या पाण्याचा वापर करता येतो.उन्हाळ्याच्या पाणीटंचाईच्या दिवसात वरच्या जंगल भागात वावरणाºया वन्यजीवांची तहान या साठवण टाक्या भागवतात आणि ते वन्यप्राणी गावांत येत नाहीत. तरुणांच्या या अभिनव उपक्रमामुळे वणवे रोखले जावून वनसंपदा टिकून राहिली आहे. या भागातील लोक जंगलातून आंबे(कैरी) आणून विक्रीचा व्यवसाय करतात. वणवे रोखल्यामुळे जंगलभागात पिकणारा रानमेवाही वाचला आहे. त्यातून स्थानिकांना चांगला रोजगारही उपलब्ध झाला आहे. गेल्या बारा वर्षातील सातत्यपूर्ण प्रयत्नांती दिसेनासे झालेले प्राणी-पक्षी जंगलात पुन्हा वास्तव्यास आले आहेत.वनविभाग वा शासकीय यंत्रणेस मात्रकल्पना नाहीसद्यस्थितीत भिवघरचा संपूर्ण परिसर हिरवळीने नटलेला दिसतो. मोर, ससे, भेकर यासारखे प्राणी, असंख्य पक्षी पुन्हा या परिसरात दिसू लागले आहेत. संपूर्ण परिसर रान, वृक्ष, वेलींनी भारून गेला आहे. विहिरी, तलावांची पाण्याची पातळी वाढली, आदिवासी बांधवांना रोजगार मिळू लागला. ही निसर्गाची कृपा असली तरी खरी किमया या तरुणांच्या वणवा विरोधी अभियानाचीच आहे, याची दखल मात्र अद्याप वनविभाग वा कोणत्याही शासकीय यंत्रणेने घेतलेली नाही.नैसर्गिक जलपातळीत वाढ, पाणी टँकर बंदवणवे आणि वृक्षतोड थांबल्याने जमिनीतील नैसर्गिक जलपातळी वृद्धिंगत होवून, गावातील विहिरींच्या जलपातळीत वाढ झाली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत विहिरींना पाणी असते. परिणामी उन्हाळी पाणीटंचाई अंतर्गत गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत नसल्याचे भिवघर वनप्रेमी संघटनेचे श्याम गायकवाड यांनी सांगितले.गेल्या पाच वर्षांत जंगलात वणवा नाहीकिशोर पवार आणि श्याम गायकवाड या जिद्दी तरुणांच्या सोबतीने गावातील तरुण व आदिवासी यांची वनप्रेमी संघटना उभी राहिली आणि वणव्याशी झुंज सुरू झाली. रात्री ९ ते १२ या वेळेस जंगलात जावून जाळ रेषा मारून वणवा पसरण्याची प्रक्रिया त्यांनी खंडित केली. आता वणवा पूर्णपणे थांबला आहे. मध्येच कधी वणवा लागला तर गावांतील आदिवासी व तरुण तत्काळ जंगलात धावत जावून त्यावर नियंत्रण मिळवितात. गेल्या पाच वर्षांपासून जंगल वणव्यापासून दूर ठेवून या तरुणांनी एक आगळा आदर्शच निर्माण केला.