शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

पाणीपुरवठा योजनेच्या साठवण विहिरीत शेवाळ, वर्षभरात विहिरींची साफसफाईच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 2:07 AM

बिरदोले गावाजवळ उल्हासनदीलगत असलेल्या पोशीर पाणीपुरवठा योजनेच्या साठवण टाकीची दुरवस्था झाली असून, टाकीतील पाण्यावर शेवाळ, जलपर्णीचे थर साचले आहेत. वर्षभरात एकदाही या साठवण टाकीची साफसफाई केली नसल्याने पाण्यावर जलपर्णी साचली आहे.

- कांता हाबळेनेरळ : बिरदोले गावाजवळ उल्हासनदीलगत असलेल्या पोशीर पाणीपुरवठा योजनेच्या साठवण टाकीची दुरवस्था झाली असून, टाकीतील पाण्यावर शेवाळ, जलपर्णीचे थर साचले आहेत. वर्षभरात एकदाही या साठवण टाकीची साफसफाई केली नसल्याने पाण्यावर जलपर्णी साचली आहे.पोशीर ग्रामपंचायतीची १९६७ पासून अस्तित्वात असलेली जुनी पाणीपुरवठा योजना अखेरच्या घटका मोजत असल्याने या मोठ्या लोकसंख्येच्या पोशीर व त्यासोबत चिकणपाडा या गावांना पाणीपुरवठा करणे दुष्कर बनले होते. रायगड जिल्हा परिषदेच्या कळंब प्रभागातील सदस्य सुदाम पेमारे यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय पेयजल योजनेतून एक कोटी २५ लाख रु पये इतक्या निधीची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. ही योजना पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या जलवाहिनीस गळती लागल्याचे यापूर्वी अनेकदा घडले आहे. या नवीन पाणीयोजनेला अजून दोन वर्षेही पूर्ण झाली नाहीत आणि तिची अशी दुरवस्था झाली आहे, त्यामुळे या योजनेचे भवितव्य काय? असा प्रश्न उभा ठाकला आहे.या पाणीयोजनेबाबत पोशीर ग्रामपंचायत आपली जबाबदारी झटकत असून या वर्षभरातच या योजनेचा बोजवारा उडाला आहे. या योजनेच्या बिरदोले येथील साठवण टाकीत शेवाळ आणि जलपर्णी वाढल्याने पृष्ठभागावरील पाणी पूर्ण झाकून गेले आहे, साठवण टाकीच्या या अवस्थेकडे लक्ष देण्यास ग्रामपंचायतीला वेळ नाही. २०१७ पासून आजतागायत दीड वर्षे पूर्ण होऊनदेखील ही योजना पोशीर ग्रामपंचायतीने अद्याप ताब्यात घेतली नाही, त्यामुळे तिच्या देखभाल दुरु स्तीचा खर्च पोशीर गाव पाणीपुरवठा समितीकडून केला जातो. मागील काही ग्रामसभांमध्ये हा मुद्दा वारंवार चर्चेस आला आहे. मात्र, ही योजना ग्रामपंचायत का स्वीकारत नाही याबद्दल अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. अद्याप ही योजना पोशीर ग्रामपंचायतीने ताब्यात न घेतल्याने पाणीपुरवठा समितीला तिची देखभाल दुरु स्ती करावी लागत आहे. या पाणीपुरवठा योजनेकरिता आलेले विद्युत बिल पाणीपुरवठा समितीला पाणीपट्टी वसूल करून भरावे लागत आहे. त्यातूनच कर्मचाऱ्यांचा पगारदेखील द्यावा लागत आहे. अनेकांनी पाणीपट्टी थकविली आहे. तूर्तास या साठवण टाकीतील शेवाळ व जलपर्णी काढून टाकणे आवश्यक आहे.या पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीस अनेक ठिकाणी जोडणी दिल्याने गळती होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पोशीर पाणीपुरवठा योजनेच्या या समस्यांकडे लक्ष देण्यास ग्रामपंचायतीस वेळ नसल्याने पाणी कमिटीनेही दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे, त्यामुळे साठवण टाकीत साठलेली जलपर्णी आणि शेवाळ काढले नाही तर पोशीर ग्रामस्थांना काही दिवसांत दूषित पाण्याचा सामना करावा लागेल यात शंका नाही.पोशीरमधील पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर अनेक ठिकाणी गळती लागली होती. त्यामुळे वर्षभर ही योजना पाणी कमिटीच्या ताब्यात दिली आहे. ती कशा प्रकारे चालते पाहण्यासाठी ताब्यात घेतली नव्हती; परंतु या योजनेचा पूर्ण हिशोब पाणी कमिटीने ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिल्यानंतर ही योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घेण्यासंदर्भात आम्ही नियोजन करणार आहोत.- हरिचंद्र निरगुडा, सरपंच,पोशीर ग्रामपंचायतपोशीर आणि चिकणपाडामधील अनेक नळधारकांची पाणीपट्टी थकली आहे, त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. तरी पाणीपुरवठा साठवण विहिरीची पाहणी करून लवकरच टाकीची (विहिरीची) साफसफाई केली जाईल.- मालू शिंगटे, अध्यक्ष, पोशीर पाणी कमिटी

टॅग्स :WaterपाणीRaigadरायगड