वरंध घाटात एसटी बस कोसळली; १७ प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 12:34 IST2025-03-16T12:34:14+5:302025-03-16T12:34:32+5:30
बसचा ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचे समजते. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत...

वरंध घाटात एसटी बस कोसळली; १७ प्रवासी जखमी
महाड : भोर-महाड मार्गावरील वरंध घाटामध्ये शनिवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास रामदास पठार-महाड ही बस दरीत कोसळली. अपघातात १८ पैकी १७ प्रवासी जखमी झाले. यामध्ये दोन जण गंभीर जखमी आहेत. बसचा ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचे समजते. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महाड तालुक्यातील रामदास पठार येथून अडीच वाजताच्या सुमारास बस महाडकडे निघाली. घाटात पारमाची गावाजवळ असलेल्या एका अवघड वळणावर असताना तिचा ब्रेक निकामी झाला. त्यानंतर बस दरीत कोसळत गेली. अपघातात १७ प्रवासी जखमी झाले. त्यांना तत्काळ बिरवाडी आणि महाड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
जखमींची नावे
सुभद्रा सोपान धनावडे (६५), हनुमंत लक्ष्मण डिगे (५०, रा. माझेरी, बसचालक), राजेश नथुराम साळुंखे (५३, रा. शिरगाव), काशीबाई ज्ञानदेव जाधव (७०, रा. रामदास पठार), ज्ञानदेव पांडुरंग जाधव (७५, रामदास पठार), सुनीता सुरेश चौधरी (६३, वडघर), साईज्ञा संकेत मालुसरे (६, ठाणे), आशा रघुनाथ मालुसरे (६५, पारमाची), रघुनाथ नारायण मालुसरे (५८, पारमाची), दगडाबाई दत्ताराम पांडे (७७, तळिये), तुळशीबाई राजाराम यादव (६५, तळिये), मंदा हैबत पवार (रा. पारमाची), सुवर्णा सुधीर धनावडे (४५, वरंध), कांचना दिलीप मालुसरे (४०, पारमाची), सुप्रिया संभाजी धनावडे (५५, वरंध), नीलिमा चंद्रकांत पोळ (३०, तळिये), अथर्व चंद्रकांत पोळ (५, तळिये), अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर डॉ. शंतनू डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या जखमींवर उपचार करण्यात आले.