शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

चालकाच्या सतर्कतेने टळला एसटी अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 03:34 IST

कळंब-नेरळ मार्गावरील संभाव्य अपघात एसटीचालक व वाहक यांच्या सतर्कतेमुळे टळला. कर्जत एसटी आगाराच्या ओलमन-नेरळ बसच्या मागील चाकाचे नट्स निघाल्याने मोठा अपघात होता होता वाचला.

- कांता हाबळेनेरळ : कळंब-नेरळ मार्गावरील संभाव्य अपघात एसटीचालक व वाहक यांच्या सतर्कतेमुळे टळला. कर्जत एसटी आगाराच्या ओलमन-नेरळ बसच्या मागील चाकाचे नट्स निघाल्याने मोठा अपघात होता होता वाचला. चालकाला काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्याने बिरदोले नजीक गाडी थांबवल्याने पुढील अनर्थ टळला.कर्जत आगाराची बस बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ओलमनहून नेरळकडे येत असताना, वाहनचालक चव्हाण यांना गाडीच्या चाकांमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आला व त्यांनी बस थांबवून चाकांचे निरीक्षण केले. या वेळी मागील चाकाचे दोन नट ढिले होऊन निखळण्याच्या स्थितीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. खरे तर बसच्या चाकाला आठ नट बसवलेले असतात; पण या बसच्या चाकास बसवलेल्या आठ नट्सपैकी पाच नट्स आधीच निघालेले होते तर उरलेल्या तीन नट्स पैकी दोन सैल होऊन निघाले होते, त्यामुळे ते चाक बसपासून निखळून अपघात होण्याची स्थिती निर्माण झाली होती. चालक चव्हाण यांनी स्वत:च ते नट बसवून गाडी नेरळपर्यंत नेली. बसचा चालक चव्हाण व वाहक आगीवले यांनी दाखवलेल्या सावधगिरीमुळे ओलमन बसमधील २५ प्रवाशांचा जीव वाचला. या संदर्भात कर्जत आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Accidentअपघात