शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

गणेशोत्सवपूर्व रस्ताकामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 2:32 AM

गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाणाºया गणेशभक्तांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी सद्यस्थितीतील रस्त्यांच्या डागडुजीच्या कामांना वेग आला

नागोठणे : गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाणाºया गणेशभक्तांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी सद्यस्थितीतील रस्त्यांच्या डागडुजीच्या कामांना वेग आला आहे. गुरुवारी सकाळी राज्याचे महसूल, मदत-पुनर्वसन व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून त्यांनी सायन ते पनवेल महामार्ग, तेथून पुढे पळस्पे फाटा येथून वडखळ मार्गे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पाहणीला सुरुवात केली. या वेळी त्यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष सिंग, सचिव सी. पी. जोशी, सचिव अजित सगणे, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, सार्वजनिक बांधकाम कोकण विभागाचे मुख्य अभियंता केडगे, विशेष प्रकल्प अधीक्षक आर. टी. पाटील, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे राजीव सिंग व प्रशांत फेगडे आदी वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक बांधकाम व महसूल प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.या वेळी चंद्रकांत पाटील यांनी पळस्पे फाटा मार्गे खारपाडा, पेण, वडखळ, नागोठणे, वाकण फाटा मार्गे पाली ते खोपोली मार्गाची पाहणी केली. पनवेल व पाली येथील विश्रामगृहांवर थांबून त्यांनी अधिकाºयांना सूचना दिल्या व स्थानिक पदाधिकाºयांचे म्हणणेही ऐकून घेतले. रस्ते डागडुजीच्या कामास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले.अधिकाºयांना सूचनाया वेळी मंत्री पाटील यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते डागडुजीच्या कामास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले. तसेच २२ तारखेच्या आत ही कामे पूर्ण होतील, या पद्धतीने नियोजन करावे, अशा सूचनाही संबंधित अधिकाºयांना दिल्या.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव