शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
2
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
3
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
4
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
5
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
6
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
7
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
8
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
9
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
10
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
12
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
13
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
14
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
15
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
16
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
17
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
18
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
19
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
20
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या

‘शासन आपल्या दारी’मुळे काहींना पोटशूळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 07:55 IST

"या उपक्रमातून आतापर्यंत अडीच कोटी जनतेला लाभ मिळवून दिला असल्याचे सांगत ‘शासन आपल्या दारी’ हा राजकीय नसून शासकीय कार्यक्रम आहे."

अलिबाग : पूर्वी सरकारी काम आणि सहा महिने थांब, अशी अवस्था होती. आता सरकारच जनतेच्या दारात जात आहे. या उपक्रमातून आतापर्यंत अडीच कोटी जनतेला लाभ मिळवून दिला असल्याचे सांगत ‘शासन आपल्या दारी’ हा राजकीय नसून शासकीय कार्यक्रम आहे. मात्र, काही जणांच्या पोटात पोटशूळ उठत आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. 

‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान महाविद्यालय, लोणेरे येथे झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा घेण्यात आला. शासन आपल्या दारी कार्यक्रमात विविध विभागातील लाभार्थींना मिळालेल्या लाभाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी तळीये दरडग्रस्तांना बांधण्यात आलेल्या ६६ घरांच्या चाव्याही देण्यात आल्या. 

विकासाच्या घोषणा-  रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टीसाठी पन्नास कोटींची अंमलबजावणी करण्यात आली आहे. -  माणगाव नगर पंचायत नव्या इमारती १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. -  पावनखिंड येथे पायी जाणाऱ्या शिवभक्तांसाठी विश्रामगृह बांधण्यात येणार असून १५ कोटी मंजूर केले आहेत. -  सिंदखेड येथे स्मारकास १५ कोटी मंजूर केले आहेत. -  कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी ५०० कोटी दिले असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. 

डेटा सेंटरमुळे विकास : फडणवीसरायगड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणारे प्रकल्प येत आहेत. रायगड, नवी मुंबई ही डेटा सेंटरची राजधानी होणार आहे. पुढील काळात चित्र बदलत आहे. सामान्यांचा विचार केला आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

जमिनी विकू नका : अजित पवाररायगडला निसर्गाने भरभरून दिले आहे. पुणेकरही रायगडच्या प्रेमात पडले आहेत. जिल्ह्यातील जेट्टीचे जाळे आम्ही तयार करीत आहोत. जिल्ह्यातच रोजगारनिर्मितीचा आमचा उद्देश आहे. त्यामुळे जमिनी विकू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

‘चाकरमानी पुन्हा गावात आला पाहिजे’छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य केले. त्याच धर्तीवर सरकार हे जनतेच्या दारी जात असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कोकणातील स्थलांतराच्या मुद्द्याला हात घालत, कोकण म्हणजे समुद्र, निसर्ग, जंगल, मंदिर यांनी नटलेला आहे.  कोकणात विकास साधून येथील तरुणांना आपल्या गावातच रोजगार प्राप्त करून देण्याचा आमचा मानस आहे, अस सरकारकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेState Governmentराज्य सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार