शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये गोगावलेंची डोकेदुखी वाढणार? ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 07:58 IST

रायगडमध्ये ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Snehal Jagtap Raigad: कोकणात पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेला महाडमधून ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या स्नेहल जगताप यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटलं जात आहे. आधी भाजपच्या वाटेवर असलेल्या स्नेहल जगताप आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच स्नेहल जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता अजित पवार यांच्या उपस्थितीत स्नेहल जगताप यांचा अधिकृत प्रवेश होणार असल्याचे बोललं जात आहे.

पालकमंत्री पदावरून रायगडच्या राजकारणात सध्या  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे. मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु आहे. अशातच भरत गोगावले यांच्या कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्नेहन जगताप यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रेवशाची जोरदार चर्चा सुरु झालीय. त्यामुळे रायगडमध्ये गोगावलेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.  शिवसेना ठाकरे गटाच्या महाड विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्नेहल जगताप या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दोन दिवसांपूर्वी सुतारवाडी येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यालयात यासंदर्भात दोन तास बैठक झाली. या बैठकीला माजी आमदार अनिकेत तटकरे देखील उपस्थित होते.

रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत खटके उडत असतानाच सुनील तटकरे यांनी मोठी खेळी खेळल्याचे बोललं जात आहे. स्नेहल जगताप यांनी सहकुटुंब सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यामुळे स्नेहल जगताप या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली. त्यानंतर आता मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. जगताप यांच्या पक्षप्रवेशाने रायगडमध्ये महायुतीमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जगतापांच्या पक्षप्रवेशांच्या चर्चांवर मंत्री भरत गोगावले यांनी भाष्य केलं. कोणीही कितीही एकत्र आले तरी मला फरक पडत नाही, असं गोगावले यांनी म्हटलं. "स्नेहल जगताप यांच्या वडिलांपासून आम्हाला सगळं माहिती आहे. स्नेहल जगताप यांचा हा पाचवा पक्षप्रवेश असेल.  त्यांच्याकडे आता नितीमत्ता राहिलेली नाही. ज्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिली त्या गोष्टीला चार महिने सुद्धा झाले नाहीत. जगताप कुटुंब जिथे जातं तिथे काय होतं हे अख्ख्या महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे," अशी टीका भरत गोगावले यांनी केली. 

टॅग्स :Raigadरायगडsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार