रोहा तांबडी येथील बलात्कार व हत्या प्रकरणात आज आणखी सहा नराधमांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 22:25 IST2020-07-31T22:24:30+5:302020-07-31T22:25:18+5:30

तांबडीतील एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर या सर्वांनी मिळून सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

Six more arrested in Roha Tambadi rape and murder case | रोहा तांबडी येथील बलात्कार व हत्या प्रकरणात आज आणखी सहा नराधमांना अटक

रोहा तांबडी येथील बलात्कार व हत्या प्रकरणात आज आणखी सहा नराधमांना अटक

रायगड :  रोहा तांबडी येथील बलात्कार व हत्या प्रकरणात आज आणखी सहा नराधमांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. यामध्ये १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तांबडीतील एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर या सर्वांनी मिळून सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. या गुन्हयातील आरोपींची एकूण संख्या सात झाली आहे

रोहा तांबडी येथील पीडित मुलगी 26 जुलै रोजी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास दुचाकी घेऊन तिच्या आजोबांना आणण्यासाठी ताम्हणशेत येथील शेतावर निघाली होती. मात्र रात्रीचे आठ वाजले तरी न परतल्याने तिच्या आई-वडिलांनी, ग्रामस्थांनी शोध घेतला असता रात्री साडेनऊ वाजण्याच्यादरम्यान ती ताम्हणशेत बुद्रुक गावच्या रस्त्यावरील वावळ्यांचा कोंड या ओहळाच्या मध्यभागी एका दगडावर मृतावस्थेत आढळून आली होती. तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण रायगडातून तीव्र संताप व्यक्त करत, आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. पीडीत मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याचे त्यावेळी बोलले जात होते, पोलिसांनी आज सहा जणांना पकडले त्यातील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन अन्य पाच जणांना अटक केली आहे 

दरम्यान, आरोपींना शनिवारी न्यालायत हजर करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले,

Web Title: Six more arrested in Roha Tambadi rape and murder case