म्हसळा येथे श्रमदानातून सहा बंधारे; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 11:52 PM2020-02-02T23:52:52+5:302020-02-02T23:52:59+5:30

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

Six bonds paid from labor at Mhasla; Contribute to the 'Hold water, freeze water' scheme | म्हसळा येथे श्रमदानातून सहा बंधारे; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेला हातभार

म्हसळा येथे श्रमदानातून सहा बंधारे; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेला हातभार

Next

म्हसळा : राज्यातील विविध नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. दरवर्षी त्यातील गाळ काढल्यास पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत नद्या, तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम सुरू आहे. श्रीसदस्यांनी म्हसळा तालुक्यात कोंढे, सकलप, मेंदडी, घोणसे, विठ्ठलवाडी या ठिकाणी मातीचे पाच बंधारे बांधले आहेत. यामुळे या ठिकाणी पाणीटंचाईची समस्या दूर होऊन मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाद्वारे प्रतिष्ठानने शासनाच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेला हातभार लावला आहे.

पाण्याची उपलब्धता आहे म्हणून नागरिकांनी त्याचा अपव्यव करू नये ते जपून वापरावे, असे आवाहन प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे. दिवसेंदिवस पाण्याची समस्या गंभीर होत आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो; त्यामुळे येथील तलाव, नद्या दुथडी भरून वाहतात; परंतु त्याच तलाव आणि नद्यांमधील गाळ काढल्याने त्यांची साठवण क्षमता वाढणार आहे, यामुळे पाणीटंचाईवर मात करता येईल. श्रीसदस्यांनी म्हसळा तालुक्यात कोंढे, सकलप, मेंदडी, घोणसे, विठ्ठलवाडी या ठिकाणी मातीचे पाच बंधारे बांधण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुक्यात बंधारे बाधण्यात आले.

तळेगाववाडी गावालगत बंधारा

मोहोपाडा : वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील तळेगाववाडी गावालगतच्या नदीवर ग्रामपंचायतीच्या ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या उपक्रमांतर्गत वासांबे ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून वनराई बंधारा बांधला. या नदीवरील बंधाºयामुळे शेतकऱ्यांना आपले फळे, भाज्यांचे मळे फुलवण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे ग्रामस्थांसह वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले.

तळेगाववाडी गावाजवळून जाणाऱ्या नदीच्या पाण्यावर शेतकरी पालेभाज्या आदीचे पीक घेतो. तसेच आसपासच्या परिसरातील गुरे पिण्याच्या पाण्यासाठी या पाण्याचा वापर करतात; परंतु फेब्रुवारी महिना लागताच या नदीच्या पाण्याची पातळी कमी होत गेल्याने शेतकºयांना पाणीसमस्येला सामोरे जावे लागते, याकरिता वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन तळेगाववाडी नदीवर वनराई बंधारा बांधण्यासाठी श्रमदान केले.

या वेळी सरपंच ताई पवार, उपसरपंच राकेश खारकर, ग्रामविकास अधिकारी संजय बडे, माजी उपसरपंच दत्ता शिंदे, सदस्य स्वप्निल राऊत, ग्रामपंचायत इंजिनीअर उत्तम माळी आदीसह सदस्य व कर्मचाऱ्यांनी हातात घमेल, फावडे, टिकाव घेऊन श्रमदान केले. या बंध्यांमुळे डोंगरमाथ्यावरून येणारे पाणी अडविण्यात आले असून, या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना होणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी संजय बडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

प्रस्तावाला होता विरोध

ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि कमचाºयांनी अशा प्रकारे श्रमदान करून ग्रामस्थांना पाणीटंचाई भसणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. सर्वांनीच असे प्रयत्न के ले तर गावचा विकास नक्कीच होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यास होणार मदत

या बंधाऱ्यामुळे त्या भागातील भूगर्भातील पाण्याचा साठा वाढण्यास मदत होणार हे मातीचे बंधारे बांधल्याने पिण्याचे पाणी, विहिरीतील जलसाठा तसेच जनावरे, पक्ष्यांनाही त्याचा उपयोग होणार आहे.विशेष बंधारे बांधल्यामुळे त्या नदी-नाल्यातील पावसाच्या पाण्याने झालेली धूप थांबणार आहे. शासनाच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यामध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.या प्रतिष्ठानने असा समाजोपयोगी उपक्रम राबवत शासनाच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमाला हातभार लावला आहे. वनराई बंधारे बांधल्याने गावातील ग्रामस्थ प्रतिष्ठानचे कौतुक करत आहेत.

Web Title: Six bonds paid from labor at Mhasla; Contribute to the 'Hold water, freeze water' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.