शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

श्रीवर्धनमध्ये मच्छीमारांचा आक्रोश, नगरपालिका ते तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 02:40 IST

या वर्षी पाऊस प्रचंड प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तर दुसरीकडे समुद्रात वादळी वारे निर्माण झाल्याने मासेमारी व्यवसाय धोक्यात आला.

श्रीवर्धन : या वर्षी पाऊस प्रचंड प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तर दुसरीकडे समुद्रात वादळी वारे निर्माण झाल्याने मासेमारी व्यवसाय धोक्यात आला. त्याचे दूरगामी परिणाम रायगड जिल्ह्यातील मासेमारी करणाºया लोकांच्या जीवनावर झाले आहेत.यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतक-याला एकरी मदत देण्यात आली आहे; त्याच धर्तीवर मासेमारी करणाऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी श्रीवर्धनमधील मासेमारी करणाºयांनी केली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता श्रीवर्धन तालुक्यातील कोळी समाजाने नगरपालिका ते तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढत श्रीवर्धन तालुक्यात मत्स्य दुष्काळ जाहीर करावा असे फलक घेऊन शासन दरबारी आपला आक्रोश व्यक्त केला. या पदयात्रेत तालुक्यातील कोळी समाजातील महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.डिझेल सबसिडी मिळावी, शेतक-यांप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी, उपजीविकेचे दुसरे साधन उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी कोळी समाजाच्या विविध नेत्यांनी समाजाला संबोधित करताना व्यक्त केली. श्रीवर्धन कुणबी समाज सभागृहात तालुक्यातील सर्व मच्छीमार संघटनानी पत्रकारांशी संवाद साधत आपल्या व्यथा व्यक्त मांडल्या. तहसीलदार सचिन गोसावी यांना सर्व मासेमारी करणाºयांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दुपारी १ च्या सुमारास दिले. त्यापूर्वी श्रीवर्धन शिवसेना कार्यकारिणीने ११ वाजता मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याबाबत निवेदन सादर केले. शिवसेनेकडून तालुकाप्रमुख प्रतोष कोलथरकर, सुयोग लांगी, जुनेद दुस्ते, नगरसेवक प्रीतम श्रीवर्धनकर व कोळी समाज आणि मासळी व्यावसायिकांच्या वतीने रामचंद्र वाघे, दिनेश चोगले, यशवंत चौलकर, इम्तियाज कोळपे, हरिदास वाघे, नंदू रघुवीर, भास्कर चौलकर, सायब हंमदुल्ले यांनी निवेदन दिले.वादळाने मच्छीमारांचे नुकसानगेल्या दोन वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. पावसाळ्यात बोटीची डागडुजी व नवनिर्मिती केली जाते. साधारणत: बोटीच्या आकारानुसार ५० हजारांपासून ते २ लाखांपर्यंतचा खर्च बोट निर्मितीसाठी येतो. मासेमारी करण्यासाठी जाळे प्रत्येक वर्षी नवीन बनवले जाते किंवा जुन्या जाळ्याची खर्च करून दुरुस्ती केली जाते. बोटींवर काम करणाºया खलाशांना आगाऊ रक्कम दिली जाते. या वर्षी आलेल्या ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळांनी मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या जनसामान्यांचे उपजीविकेचे साधन हिरावून घेतले आहे. खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासे मिळत नाहीत; पूर्वी ५ वावापर्यंत जाऊन मासे मिळत होते, आता १२ वावाच्या पुढे जाऊनसुद्धा मासे मिळत नाहीत, असे चंद्रकांत वाघे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.या वर्षी मासळी मिळत नसल्याने कोळी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. मासेमारी हा कोळी समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. सरकारने मत्स्य दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे .- भारत चोगले,व्यावसायिक, श्रीवर्धनक्यार, महा वादळामुळे तसेच सतत बदलणाºया हवामानामुळे मच्छीमारांचे नुकसान होत आहेत. कोळी समाजाने त्यांची ही व्यथा, अडचण निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. हे निवेदन तत्काळ वरिष्ठ पातळीवर पाठवले जाईल.- सचिन गोसावी,तहसीलदार, श्रीवर्धन

टॅग्स :Raigadरायगडfishermanमच्छीमार