Sharad Pawar News : “काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 10:23 AM2021-09-21T10:23:01+5:302021-09-21T10:28:25+5:30

Sharad Pawar Latest news : माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेच्या एका नेत्याने शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.

shiv sena anant gite criticized ncp and sharad pawar maha vikas aghadi | Sharad Pawar News : “काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत”

Sharad Pawar News : “काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत”

Next
ठळक मुद्देकाँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्मशरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीतमाजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेच्या एका नेत्याचे टीकास्त्र

श्रीवर्धन: गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, अलीकडील काळात महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर यायला लागली असून, आता तीन पक्षातील विसंवाद जाहीरपणे बोलला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यातच माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेच्या एका नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार आरोप केले असून, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे. (shiv sena anant gite criticized ncp and sharad pawar maha vikas aghadi)

श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी शिवसेना नेते आणि माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते उपस्थित होते. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना गीते यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, या शब्दांत गीते यांनी निशाणा साधला.

संरक्षण क्षेत्रात गुंतवणुकीची सुवर्ण संधी; महाराष्ट्रातील ‘या’ कंपनीचा IPO जाहीर, पाहा, डिटेल्स

सरकार आघाडीचे आहे शिवसेनेचे नाही

शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे, हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपले सरकार आहे. आपले कशासाठी म्हणायचे तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेचे नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपले गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे, असे गीते म्हणाले. 

शिवसेना काँग्रेस एकविचाराची होऊ शकणार नाही

दोन्ही काँग्रेस कधी एकमेकांचे तोंड बघत नव्हते. यांची विचारांची सांगड बसत नव्हती. एक मते नव्हती. दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही. ते दोन एक होऊ शकत नाहीत , मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणे कदापी शक्य नाही, असे अनंत गीते यांनी म्हटले आहे. 

लहान मुलांसाठी संजीवनी! ‘या’ कंपनीची लस ठरणार अधिक प्रभावी, लवकरच मिळणार मंजुरी

दरम्यान, अनंत गीते हे रायगडमधील शिवसेनेचे बडे नेते आहेत. सन २०१४ मध्ये मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये केंद्रीय अवजड उद्योगमंत्री होते. मात्र, सन २०१९ च्या निवडणुकीत तत्कालिन शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री असलेले अनंत गीते पराभूत झाले होते. सुनील तटकरे यांनीच अनंत गीते यांना पराभूत करुन, पराभवाचा वचपा काढला.
 

Web Title: shiv sena anant gite criticized ncp and sharad pawar maha vikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app