शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शिंदे गटाच्या आमदाराची एसयूव्ही चुकीच्या लेनमध्ये घुसली; धडकेत तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 13:50 IST

मोटारसायकलस्वाराच्या मृत्यूप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल; अद्याप अटक नाही

अलिबाग : शिवसेनेच्या शिंदे गटाचे अलिबाग - मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आ. महेंद्र दळवी यांच्या एसयूव्हीने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत शनिवारी एका तरुणाचा मृत्यू झाला. आ. दळवी यांची गाडी उसडी टोलनोक्यावर लेनमध्ये चुकीच्या दिशेने आली. त्यात झालेल्या धडकेत मोटारसायकलस्वार जासिम अब्दुल रहेमान पासवारे (३१, रा. उतेखोल, माणगाव) गंभीर दुखापतीत मृत झाल्याचे पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे. आ. दळवी यांच्या गाडी चालकाला अटक झालेली नाही.

शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास आगरदांडा - इंदापूर रस्त्यावर उसडी नाक्यावर हा अपघात झाला.  या मोटारसायकलस्वाराचा या अपघातातमृत्यू झाला. आ. दळवी यांच्या गाडीचा चालक धनेश सानकर याच्यावर मुरुड पोलिस ठाण्यात अतिवेगाने व चुकीच्या पद्धतीने वाहन चालविणे, निष्काळजीपणा करत तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आ. दळवी हे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास नांदगाव येथे निघाले होते. त्यांची लॅण्ड क्रूझर गाडी धनेश सानकर चालवित होता. यावेळी वाहनात आ. दळवी, त्याचा अंगरक्षक,   कार्यकर्ते होते. जासिम हा मुरुडहून इंदापूरकडे जात होता.

दळवी यांच्या गाडीचा चालक धनेश याने उसडी नाक्यावर गाडी चुकीच्या लेनवर घेतली. गाडी अचानक चुकीच्या दिशेने समोर आल्याने मोटारसायकलस्वार गोंधळला आणि दोन्ही वाहने धडकली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, एसयूव्हीतील एअर बॅग उघडल्या. अपघातात आ. दळवी यांना किरकोळ दुखापत झाली. जखमी जासिम अब्दुल रहेमान पासवारे यास मुरुड शासकीय रुग्णालयात दाखल केले, तेव्हा डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक अविनाश राठोड करीत आहेत.

वन-वेमुळे याच ठिकाणी तिसरा अपघात   इंदापूर - आगरदांडा या मार्गावर उसडी नाक्यावर एकच मार्ग सुरू आहे. इंदापूरकडे जाणाऱ्या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे बाह्य वळण करताना अपघाताच्या घटना घडतात. या आधीही या ठिकाणी दोन अपघात झाले आहेत. आमदार दळवींच्या वाहनाच्या अपघातानंतर शिवसैनिकांनी टोलनाक्यावरील बॅरिकेट्स काढले.

आमदारांची गाडी आणि मोटारसायकलच्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. याबाबत मुरुड पोलिस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवून तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत गाडीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकास अटक करण्यात आलेली नाही. त्याला नोटीस बजावली आहे. अपघाताबाबत चौकशी सुरू असून, नक्की चूक कोणाची, याबाबत तपास केला जाणार आहे.- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक, रायगड

टॅग्स :AccidentअपघातMLAआमदारDeathमृत्यूPoliceपोलिस