महाडजवळ मिनीडोर रिक्षा उलटून सात जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 02:37 IST2017-10-15T02:37:34+5:302017-10-15T02:37:41+5:30

महाडनजीक मुंबई-गोवा महामार्गावर एक मिनीडोर रिक्षा रस्त्याखाली उलटून झालेल्या अपघातात रिक्षातील सात प्रवासी जखमी झाले. नडगाव गावाजवळ हा अपघात झाला. जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Seven people were injured in a minor rickshaw near Mahad | महाडजवळ मिनीडोर रिक्षा उलटून सात जण जखमी

महाडजवळ मिनीडोर रिक्षा उलटून सात जण जखमी

महाड : महाडनजीक मुंबई-गोवा महामार्गावर एक मिनीडोर रिक्षा रस्त्याखाली उलटून झालेल्या अपघातात रिक्षातील सात प्रवासी जखमी झाले. नडगाव गावाजवळ हा अपघात झाला. जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लियाकत हसनिमया करबेलकर हा आपल्या ताब्यातील मिनीडोर (एमएच०६, एस-३१५६) धारवली-सवाद ते महाड असा घेऊन येत असताना, तो नडगाव गावच्या हद्दीतील वळणावर आला असता समोर असलेला खड्डा चुकविताना ताबा सुटून मिनीडोर रस्त्यावरून २० फूट खाली कोसळली. अपघातामध्ये चालक लियाकत करबेलकर याच्यासह सुनीता सीताराम गायकवाड (५५, रा. माटवण), लक्ष्मण आंजर्लेकर (६५), मिथुन आंजर्लेकर (३०), महेजबीन तार्लेकर (३१, सर्व रा. सवाद), अंकिता दीपक सकपाळ (१९, रा. धारवली) आणि उज्ज्वला समीर मांढरे (२४, रा. माटवण), हे प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Web Title: Seven people were injured in a minor rickshaw near Mahad

टॅग्स :Accidentअपघात