शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महाड तालुक्यातील बीजगुणन केंद्राची सात एकर जमीन ओसाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 01:27 IST

निधीअभावी यंत्रणा धूळ खात पडून

दासगाव :  शेतकऱ्यांच्या दृष्टीने कृषी क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र असलेल्या तालुका बीजगुणन केंद्राला शासनाने गेल्या  चार वर्षांत निधी न दिल्याने  विविध उपक्रमांपासून हे केंद्र दुर्लक्षित आहे. येथील शेतीची आधुनिक यंत्रणादेखील धूळ खात पडून आहे. निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या या केंद्रात पाच वर्षांपासून  भात बियाणांचे उत्पादनच झालेले नाही, त्यामुळे सुमारे साडेसात एकर जमीन ओसाड पडली आहे.

महाड तालुक्यात कृषी विभागाकडून निर्माण करण्यात आलेल्या तालुका बीजगुणन केंद्राला गेल्या काही वर्षांत निधी उपलब्ध न झाल्याने याठिकाणी  भात बियाणांचे उत्पादन यावर्षी झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या केंद्रातून भात बियाणे उपलब्ध न झाल्याने खासगी भात बियाणे अधिक पैसे मोजून विकत घ्यावे लागत आहे. साडेसात एकर परिसरात पसरलेल्या या तालुका बीजगुणन केंद्रात भात बियाणांचे उत्पादन, शेतकरी मार्गदर्शन केंद्र, गांडूळ खत निर्मिती, फळबाग आदी घटकांचा समावेश आहे. याठिकाणी प्रतिवर्षी जवळपास १३५ ते १४० क्विंटल भात बियाणे निर्मिती केली जात होती. स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार किंवा बाजारात मागणी असलेली  भात बियाणे याठिकाणी उत्पादन करून शेतकऱ्यांना सवलतीने हे भात बियाणे पुरवठा केले जात होते. यामाध्यमातून केंद्राला अंदाजे पाच लक्ष रुपये प्राप्त होत होते. या बियाणांच्या उत्पादनाकरिता लागणाऱ्या सामग्रीसाठी निधीची आवश्यकता असते; मात्र गेली दोन वर्षे निधी न मिळाल्याने यावर्षी भात बियाणे उत्पादन झाले नाही. या  बीजगुणन केंद्रावर उत्पादित केले जाणारे कर्जत २ आणि कर्जत ६ या भात बियाणांना मोठी मागणी आहे.

बीजगुणन केंद्र  महाडपासून सुमारे चार किमी अंतरावर आहे. मात्र हे केंद्र महामार्ग आणि महाडपासून आडमार्गावर असल्याने शेतकऱ्यांना याठिकाणी जाण्या-येण्याकरिता वाहनांची सुविधा नाही. वयोवृद्ध शेतकरी या केंद्रापर्यंत जात नाहीत. काळाच्या ओघात या बीजगुणन केंद्राकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे भविष्यात या  केंद्रांची अवस्था बिकट होत चालली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या काळात हरितक्रांतीची सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील सुधारित बियाणांची आणि प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन या केंद्रांची निर्मिती झाली, मात्र आधुनिक काळात बियाणे तयार करणाऱ्या अनेक कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. भविष्यात बीजगुणन केंद्रात भात बियाणे उपलब्ध झाले नाही, तर खासगी कंपन्यांच्या उपलब्धतेवर शेतकऱ्यांना निर्भर राहावे लागेल.

स्थानिक पातळीवर कृषी विभागाची साडेसात एकर जनीन विनावापर ओसाड पडून   आहे. विविध प्रकारचे कृषी प्रकल्प या जागेत उभे करून रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केंद्र म्हणून पर्याय उभा करता येऊ शकतो. याशिवाय आधुनिक शेती आणि शेतीपूरक प्रकल्प आणि त्यांचे प्रयोग याठिकाणी उभे करणे आवश्यक आहे. महाड, पोलादपूरमधील शेतकऱ्यांना या केंद्रातून मार्गदर्शन आणि लागणारी  कृषी यंत्रणा उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांची गैरसोय  दूर होईल. मात्र स्थानिक आमदारांचे दुर्लक्षदेखील या केंद्राच्या दुरवस्थेला कारणीभूत ठरत आहे. साडेसात एकरमध्ये शासनाने उत्तम प्रतीचे कृषीप्रकल्प, नर्सरी, फूल उत्पादन असे प्रकल्प उभे केल्यास कृषी पर्यटनाला याठिकाणी नक्कीच चालना मिळेल.