शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज; पहिल्याच दिवशी दोन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 1:34 AM

रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मोफत मिळणार आहेत. यात इयत्ता १ली ते ८वीच्या एकूण ३ हजार २७२ शाळांमधील २ लाख ७ हजार ८४५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

- जयंत धुळपअलिबाग : रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मोफत मिळणार आहेत. यात इयत्ता १ली ते ८वीच्या एकूण ३ हजार २७२ शाळांमधील २ लाख ७ हजार ८४५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना १५ जून रोजी ११ लाख २६ हजार १५६ पाठ्यपुस्तके मोफत देणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.बालभारती भांडारातून रायगडमधील या सर्व शाळांकरिता आवश्यक पाठ्यपुस्तके जिल्ह्यास प्राप्त झाली आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ३७४ शाळा महाड तालुक्यात असून या शाळांतील १४ हजार २४८ विद्यार्थ्यांना ७८ हजार ३८३ पुस्तकांचे वितरण करण्यात येईल.उर्वरित तालुक्यांत अलिबागमधील २५१ शाळांच्या १५ हजार ८८१ विद्यार्थ्यांना ८६ हजार ४९८, पेणमधील २७५ शाळांच्या १७ हजार ३०६ विद्यार्थ्यांना ९३ हजार १७, पनवेलमधील ३४५ शाळांच्या ५१हजार ६१ विद्यार्थ्यांना २ लाख ७७ हजार ३२९, उरणमधील ८० शाळांच्या १० हजार ९२९ विद्यार्थ्यांना ५६ हजार १५४, कर्जतमधील ३१७ शाळांच्या २१ हजार १२० विद्यार्थ्यांना १ लाख १४ हजार ९८०, खालापूरमधील २२८ शाळांच्या १५ हजार ७८७ विद्यार्थ्यांना ८४ हजार ९७७, सुधागडमधील १७३ शाळांच्या ९ हजार ३०९ विद्यार्थ्यांना ५० हजार १०९, रोहामधील २८५ शाळांच्या १२ हजार ८९९ विद्यार्थ्यांना ६९ हजार २७८, माणगावमधील ३२६ शाळांच्या १४ हजार २४८ विद्यार्थ्यांना ७८ हजार ३८३, महाडमधील ३७४ शाळांच्या १४ हजार ३०० विद्यार्थ्यांना ७७ हजार ६७५, पोलादपूरमधील १५७ शाळांच्या ३ हजार ९४७ विद्यार्थ्यांना २१ हजार ३६९, म्हसळामधील १२२ शाळांच्या ५ हजार १८४ विद्यार्थ्यांना २९ हजार १७२, श्रीवर्धनमधील १२३ शाळांच्या ६ हजार ९३१ विद्यार्थ्यांना ३७ हजार ८७९, मुरुडमधील ११३ शाळांच्या ५ हजार ६७४ विद्यार्थ्यांना ३१ हजार १५०, तळामधील १०२ शाळांच्या ३ हजार २६९ विद्यार्थ्यांना १८ हजार ८६ पाठ्यपुस्तके वितरित करण्याकरिता नियोजन करण्यात आले असल्याचे दराडे यांनी अखेरीस सांगितले.

टॅग्स :Schoolशाळा