शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

कोळे पाणलोट प्रकरण : भ्रष्टाचार प्रकरणी सरपंचाची उचलबांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 4:38 AM

म्हसळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोळे येथील एकात्मिक विकास पाणलोट प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरणाची अनेक वर्षांपासून चौकशी सुरू होती.

म्हसळा - तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोळे येथील एकात्मिक विकास पाणलोट प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरणाची अनेक वर्षांपासून चौकशी सुरू होती. या प्रकरणातील तक्रारदार एन.के.जाधव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या लढ्याला अखेर यश आले. ग्रामपंचायत कोळे येथील पाणलोट भ्रष्टाचारप्रकरणी ज्या सरपंचावर आरोप करण्यात आले होते, ते सरपंच अमोल शंकर पेंढारी यांना बडतर्फ करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकतेच दिले आहेत. या आदेशामुळे म्हसळा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमधील पाणलोट प्रकरणातील भ्रष्टाचार उघड होणार असून अनेक आजी-माजी सरपंचांचे धाबे दणाणले आहे.म्हसळा तालुक्यातील कोळे ग्रामपंचायतीमध्ये २०११-१२ पासून एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. प्रकल्प सुरळीत चालावे म्हणून एक समिती नेमण्यात आली असून अध्यक्ष अमोल शंकर पेंढारी होते.पेंढारी यांनी स्वत:च्या पत्नीच्या नावे पाणलोट प्रकल्पांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांचे ठेके घेतले आहेत. तसेच अन्य कामांमध्येही भ्रष्टाचार केल्याचा आरोप तक्र ारदार नारायण जाधव व पंचक्र ोशीतील ग्रामस्थांनी केले होते. सदर प्रकरणी पंचायत समिती म्हसळा गटविकास अधिकारी यांनी जबाब देऊन पेंढारी यांनी पदाचा गैरवापर केला असल्याचा ठपका ठेवत पुढील चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्र पाठविले होते. या सर्व प्रकरणाची जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी चौकशी करून पेंढारी हे ग्रामपंचायत कोळेचे सदस्य राहण्यास अनर्ह ठरविण्यात येत आहेत असा आदेश दिला आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयामुळे सरपंचाच्या मनमानी, भ्रष्टाचारी कारभाराला लगाम लागणार आहे. यापुढे कोळे नव्हे तर सर्वच ग्रामपंचायतीतील सरपंच आपल्या पदाचा मान राखून काम करतील.- राजेंद्र विचारे,पंचक्र ोशी संघटकभ्रष्टाचाराला समूळ नष्ट करण्यासाठी पंचक्र ोशीतील शिलेदारांनी सहकार्य केल्यामुळेच सरपंचाला बडतर्फ करणे शक्य झाले आहे.- डी.टी.विचारे,पंचक्र ोशी अध्यक्षकोळे ग्रुप ग्रामपंचायतीतील आजवरच्या इतिहासातील काळिमा फासणारी ही घटना आहे. स्वत:च्या पदाचा गैरवापर करून नागरिकांच्या पैशाचा गैरवापर करणे चुकीचे आहे.- सतीश रा. शिगवण, सचिव, स्थानिक विकास समितीपाणलोट प्रकल्प तसेच ग्रामपंचायतीकडून करण्यात येणाºया कामात भ्रष्टाचार होतच असतो, मात्र याविरोधात तक्रार कोण करणार, पाठपुरावा कोण करणार, असा प्रश्न आहे. कोळे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे संबंधित सर्व अधिकाºयांना देऊनही, निर्णय घेण्यास प्रशासनाला तब्बल तीन वर्षे लागली. मात्र बडतर्फीच्या निर्णयामुळे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराला आळा बसेल.- नारायण जाधव,तक्र ारदार कोळे ग्रामपंचायत

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारsarpanchसरपंचRaigadरायगड