शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
4
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
5
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
6
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
7
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
8
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
9
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
10
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
11
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
12
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
13
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
14
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
15
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?
16
परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ?
17
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
18
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
19
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
20
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

सत्संगातून स्वच्छता अभियान; प्रेम, शांती आणि समतेचा दिला संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 2:18 AM

संत निरंकारी यांनी जगाला प्रेम, शांती आणि समतेचा संदेश दिला. सध्या समाजामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा यांसारखी मानवी मूल्ये ढासळत चालली आहेत.

गिरीश गोरेगावकरमाणगाव : संत निरंकारी यांनी जगाला प्रेम, शांती आणि समतेचा संदेश दिला. सध्या समाजामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा यांसारखी मानवी मूल्ये ढासळत चालली आहेत. या मानवी मूल्यांना बळकटी देण्यासाठी १९२९मध्ये संत निरंकारी मंडळाची स्थापना झाली. आरोग्यास घातक असणाºया अस्वच्छता आणि कचरा या समस्येच्या निर्मूलनाकरिता संत निरंकारी मंडळ गेली अनेक वर्षे भारतातच नव्हे, तर जगभरातील इतर २८ देशांमध्ये अध्यात्मिक शिकवणीतून स्वच्छतेचा नारा देत आहे. याशिवाय सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, वृक्षलागवड असे विविध उपक्रम राबवित आहेत. मंडळाचे भक्तगणही अनेक उपक्रम आपापल्या तालुका शाखेतून संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून करीत असतात.माणगाव तालुक्यात तालुका मुखी राम टेंबे, प्रचारक अनिल पवार, पारुनाथ मुंडे यांनी स्वच्छतेवर भर देत संपूर्ण तालुक्यात स्वच्छता अभियान राबवून अनेक गावे कचरामुक्त केली आहेत. सार्वजनिक ठिकाणे बस स्टॅण्ड, रेल्वे स्थानक, रस्ते, वाड्या-वस्त्या येथे वेळोवेळी स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात येते. तालुक्यात स्वच्छतेची कामे करण्याकरिता तालुका शाखेकडून प्रत्येक गावात भक्तगणांचे सेवादल स्थापन करण्यात आले आहे. या सेवादलाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान नियमित राबविण्यात येते.२६३ शहरी रेल्वेस्थानकांची नियमित स्वच्छतादेशभरात एकूण २६३ शहरी रेल्वेस्थानके नियमितपणे स्वच्छ केली जातात. यामध्ये प्लॅटफॉर्म, मुख्य प्रवेशद्वार, वाहतूक तळ, तिकीटघर, स्वच्छतागृह यांचा समावेश आहे. याला अनुसरून माणगाव रेल्वेस्थानकही नियमित स्वच्छ करण्याचे नियोजनही मंडळाच्या माणगाव तालुका शाखेने केले आहे.

टॅग्स :RaigadरायगडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान