शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

अडीच वर्षांच्या चिमुरडीने केला साल्हेर किल्ला सर; कोविड योद्ध्यांना अनोखी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 06:56 IST

शार्विका म्हात्रेचा सलग दुसऱ्यांदा विक्रम

निखिल म्हात्रेअलिबाग : मनात जिद्द असेल तर अशक्य गोष्टही साध्य करता येते हे अलिबागमधील लोणारे गावातील अडीच वर्षांची चिमुरडी शार्र्विका म्हात्रे हिने गड सर करीत सिद्ध करून दाखविले आहे. कोविड योद्ध्यांना सलामी देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ला तिने शनिवारी साडेपाच तासांत सर केला. शार्विकाची चढण्याची जिद्द पाहून इतर पर्यटकांनाही किल्ला चढण्याची स्फूर्ती मिळाली. यापूर्वी शार्विका हिने १२ किल्ले सर केले आहेत.

शार्विकाने शनिवार, १० आॅक्टोबर रोजी नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र - गुजरात सीमेवरील सुमारे ५,१४१ फूट उंचीवर वसलेला महाराष्ट्रातील सर्वांत उंच किल्ला सर करून सलग दुसऱ्यांदा विक्र म नोंदविला आहे. तिने हा विक्र म कोरोना योद्ध्यांना समर्पित केला आहे. कोरोना विषाणूसारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील डॉक्टर, पत्रकार, पोलीस, सफाई कामगार आणि इतर क्षेत्रातील सर्व कोरोना योद्ध्यांना तिने मानवंदना दिली. महाराष्ट्रातील सर्वांत उंच साल्हेर किल्ल्यावर सर्वांत कमी वयात पाऊल ठेवणारी शार्विका ही एकमेव कन्या ठरली आहे. तिच्या कामगिरीची नोंद सलग दुसºयांदा ‘इंडिया बुक’ आणि ‘आशिया बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये होणार आहे. साल्हेर किल्ला हा चढाईसाठी अत्यंत कठीण मानला जातो. आजूबाजूला कशाचाही आधार नसलेल्या दगडात कोरलेल्या पायºया आणि आभाळाला भिडणारा किल्ला सर करताना भल्याभल्यांची भंबेरी उडते. मात्र या चिमुकलीने हसत-खेळत हा गड सर केला.सामाजिक संदेशशार्विकाने या किल्ल्यावर आरोहण करून गडावर तिरंगा आणि भगवा ध्वज फडकावला. तसेच गडावर स्वच्छता आणि व्यसनमुक्तीचे फलक झळकावित समाजाला एक उत्तम असा संदेश दिला. शार्विकाची प्रबळ इच्छाशक्ती असल्यामुळे तिने कलावंतीणीचा सुळका, सागरगड, प्रतापगड, खांदेरी, कुलाबा, रायगड, कोर्लई, रेवदंडा, मुरूड-जंजिरा, पद्मदुर्ग, उंदेरी, कलावंतीण दुर्ग असे १२ किल्ले व गड आई-वडिलांच्या साथीने सर केले आहेत. शार्विकाच्या या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.शार्विका गड सर करण्यापूर्वी तिच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. पूर्वतयारी करूनच गड सर करण्यात येतो. गड सर करताना मधमाश्यांपासून बचाव करण्यासाठी मोठी प्लास्टीक पिशवी, जवळच्या पोलीस स्टेशनचा नंबर, दवाखान्याचा नंबर, प्राथमिक औषधे, एक डॉक्टर असे पूर्ण नियोजन करूनच गड सर केला जातो. - जितेन म्हात्रे, शार्विकाचे वडील

टॅग्स :Fortगड